पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथील खंडोबा कडे जाणारा रस्ता झाला मोकळा. रस्त्याच्या दोन्ही बाजूची झाडे झुडपे काढली.
नारायणगाव : (प्रतिनिधी ) पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथील खंडोबामंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेले झाडां झुडपांचे अतिक्रमण ग्रामस्थांनी एकत्रित येऊन काढले व रस्ता वाहतुकीला खुला केला. या रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूने काही प्रमाणामध्ये स्थानिक लोकांनी अतिक्रमण केल्याने चार चाकी वाहन ने आन करण्यासाठी अडथळा येत होता. दरम्यान या रस्त्याचे काम माजी आमदार अतुल बेनके यांनी निधीदेखील उपलब्ध केला आहे. परंतु रस्त्याच्या दोन्ही बाजूने झाडाझुडपांची अतिक्रमण असल्याने रस्त्याचे काम करणे ठेकेदाराला शक्य होत नव्हते. महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अनंता खांडगे, श्रीकृष्ण पतसंस्थेचे अध्यक्ष नंदू खांडगे, पिंपळगाव चे माजी प्रभारी सरपंच पंकज वऱ्हाडी, प्रकाश खांडगे, श्रीराम देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष अशोक खांडगे, उपसरपंच सोपान खांडगे, पिंपळगाव सोसायटीचे उपाध्यक्ष प्रशांत चव्हाण सचिन चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते. रस्त्याच्या वाहतुकीला अडथळा ठरणारी दोन्ही बाजूची झाडेझुडपे काढली नाही तर या रस्त्याच्या कामाला आलेला निधी परत जाईल हे संबंधित लोकांना या उपस्थित मान्यवरांनी समजून सांगितल्याने रस्त्याच्या कडेची झाडे झुडपे काढण्यास दोन्ही बाजूच्या लोकांनी अनुमती दर्शवली. बारा फूट रुंदीचा डांबरी रस्ता होणारा असून दोन्ही बाजूने दोन फुटाचे गटार असणार आहे. ही झाडे झुडपे काढल्यामुळे खंडोबा परिसरातील लोकांना पिंपळगाव मध्ये ये जा करणे तसेच या रस्त्याने शेतीमाल ने आन करणे आता सोयीचे होणार आहे. दरम्यान पिंपळगाव तर्फे नारायणगाव महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अनंता खांडगे म्हणाले की, या रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूने झाडेझुडपे वाढली होती अगोदरच रस्ता अरुंद होता त्यामुळे दुचाकी व चार चाकी वाहन ने आन करताना अडचण निर्माण व्हायची तसेच बिबट्याची भीती असल्यामुळे या रस्त्याने पायी जायला देखील भीती वाटत होती.