नारायणगाव येथे बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवानी केले समुदायीक नमाज पठण.

नारायणगाव : (प्रतिनिधी ) मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मानली जाणारी बकरी ईद अर्थात ईद-उल-अजहा निमित्त नारायणगाव येथील सुन्नी जामा मस्जिद व शाही जामा मस्जिद येथे मुस्लिम बांधवांनी सामूदायिक नमाज पठण केले. यावेळी समाजात सुख शांती, एकोपा व समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. ईदच्या नमाजनंतर उपस्थित समाजबांधवांनी एकमेंकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या. सुन्नी जामा मस्जिदचे मुख्य इमाम मुफ्ती मुनाजीर हुसेन यांनी ईदचे महत्त्व विषद करत ईद त्याग आणि समर्पणाची शिकवणूक देणारी आहे असे त्यांनी सांगितले. व त्यानंतर त्यांनी बांधवांना नमाज पढविली. यावेळी बाबू पाटे म्हणाले की, आपले सण उत्सव हे एकत्र येण्यासाठी एकमेकांची खुशाली समजण्यासाठी सुख दु: खात सहभागी होण्यासाठी महत्वाचे असतात. मुस्लिम बांधवांसाठी बकरी ईद हा त्याग आणि समर्पणाचा अर्थात कुर्बानीचा सण आहे असे म्हणत मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तर पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी मुस्लिम बांधवांनी आनंदात आणि नियमांचे पालन करून शांततेत बकरी ईदचा सण साजरा करावा असे आवाहन करत बकरी ईद अर्थात ईद-उल-अजहा च्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपसरपंच योगेश उर्फ बाबू पाटे, माजी उपसरपंच आरिफ आतार, ग्रामपंचायत सदस्य जुबेर आतार, माजी उपसरपंच संतोष वाजगे, मुस्लिम जमातचे अध्यक्ष एजाज आतार, मेहबूब काझी, पोलीस निरीक्षक राजेश रामगिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, गफूर तांबोळी, रशीद इनामदार, हाजी नूर मोहमंद मनियार, हमीद दारुवाले, जुबेर शेख, रियाज आतार, सकलेन आतार, युवा शक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष अशफाक पटेल, यांसह नारायणगाव सुन्नी मुस्लिम जमातचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामपंचायत सदस्य व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निमित्ताने नारायणगाव पोलीस स्टेशनच्या वतीने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार व नारायणगाव पोलिसांच्या वतीने मुस्लिम बांधवांना ईदनिमित्त पाणी वाटप करून बकरी ईद अर्थात ईद-उल-अजहा च्या शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेहबूब काझी सर यांनी केले तर आभार सुन्नी मुस्लिम जमातचे अध्यक्ष एजाज आतार यांनी मानले.

जाहिरात

error: Content is protected !!