पावसाने बाजरी पिकाचे मोठे नुकसान.कापणी केलेल्या कणसांना आले फुटवे.

हिवरे खोडद परिसरामध्ये पावसाने बाजरीचे मोठे नुकसान कापणी केलेल्या बाजरीच्या कणसांना आले फुटवे.

नारायणगाव: पुढारी वृत्तसेवा गेले पंधरा दिवस पडत असलेल्या पावसामुळे हिवरे, खोडद परिसरामध्ये उन्हाळी बाजरीचे पीक पूर्णपणे वाया गेला असून कापणी केलेले बाजरीची कणसे शेतामध्येच राहिल्याने त्याला पुन्हा फुटवे आले आहेत. गेल्या आठ-दहा वर्षांपासून जुन्नर तालुक्यामध्ये उन्हाळी बाजरी पेरण्याचा कल शेतकऱ्यांचा जास्त राहिलेला आहे. यंदाच्या वर्षी प्रथमच उन्हाळ्यात एवढा पाऊस झाल्याने या बाजरी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी बाजरी कापून वावरतच ठेवलेली होती गेल्या पंधरा दिवसापासून सतत पडलेल्या पावसामुळे ही बाजरीची कणसे शेतकऱ्यांना काठता आली नाही. जोराच्या पावसाने बाजरी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढच्या गडाचीवाडी येथील शेतकरी विकास काळे म्हणाले की, दरवर्षी आम्ही उन्हाळ्यात बाजरी करत असतो. एक चांगले निघत असल्याने उत्पन्न देखील अधिक निघते. परंतु यंदा प्रथमच मे महिन्यात पाऊस पडल्याने कापणी केलेले बाजरीचे पीक पावसामध्ये भिजले. पावसाने उघडीत न दिल्याने संपूर्ण बाजरीची कणसे वावरतच भिजून गेले. पावसात भिजलेल्या कंसांना पुन्हा मोड फुटले. हे बाजरीचे पीक वाया गेल्याने आता वर्षभर आम्हाला बाजरी विकत घ्यावी लागेल, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. दरम्यान या पावसाने उदापूर, येडगाव, उंब्रज, भोरवाडी, शिरोली, आर्वी, गुंजाळवाडी,नारायणगाव,वारूळवाडी या भागातील शेतकरी सुद्धा उन्हाळ्यामध्ये बाजरीची पेरणी करीत असतात. वर्षभरासाठी ही बाजरी कुटुंबाचा पुरतेच शिवाय काही विक्री देखील करता येते. परंतु यंदा हे संपूर्ण बाजरीचे पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. उदयपूर येथील अनेक शेतकऱ्यांनी पाऊस येण्याच्या अगोदर बाजरीची कणसे काठून ठेवली. परंतु अचानक पाऊस सुरू झाल्याने हे बाजरी मळणी करता आली नाही.त्यामुळे घरामध्ये साठवून ठेवलेल्या कणसांना पुन्हा मोड आल्याने ही बाजरीची कणसे आता फेकून देण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय उरला नाही. @ फोटो खालील ओळ – खोडदच्या गडाचीवाडी येथील शेतकरी राजेश भालेराव यांच्या शेतात कापणी करून ठेवलेल्या बाजरीला पावसाने कोंब फटले आहेत.

जाहिरात

error: Content is protected !!