वारुळवाडीच्या हद्दीत असलेले दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतर करण्यास तीव्र विरोध.


नारायणगाव : ( प्रतिनिधी) पुणे नाशिक महामार्गावर पोलीस स्टेशनच्या जवळ वारुळवाडीचे हद्दीत गेल्या अनेक वर्षापासून असलेले दुय्यम निबंधक कार्यालय नारायणगाव येथील एका खाजगी बिल्डरच्या इमारतीमध्ये हलविण्याच्या हालचाली प्रशासन पातळीवर सुरु झाल्या असून हे कार्यालय कोणत्याही परिस्थितीत स्थलांतरीत करू नये आणि जर प्रशासनाने असा काही निर्णय घेतला तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा वारुवाडीचे सरपंच विनायक भुजबळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिला आहे. ते म्हणाले पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री 24 मे रोजी जुन्नरच्या दौऱ्यावर येत असून आम्ही याबाबतचे लेखन निवेदन त्यांना देणार आहे. यापूर्वी वारूळवाडीच्या हद्दीमध्ये वन विभागाचे तसेच उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय या ठिकाणाहून हलवली आहेत. आता राहिलेले हे एकमेव दुय्यम निबंध कार्यालयवर सुद्धा काही लोकांचा डोळा आहे. परंतु आता कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही हे कार्यालय येथून हालवू देणार नाही. भुजबळ म्हणाले की,नारायणगावच्या हद्दीत राष्ट्रीयकृत बँका, तलाठी कार्यालय, पोस्ट ऑफिस, दारू उत्पादन शुल्क ऑफिस आदी कार्यालये आहेत. नारायणगाव देखील आमचेच गाव आहे परंतु वारुळवाडी गावात दुय्यम निबंधक हे एकमेव सरकारी कार्यालय शिल्लक राहिले आहे. ते सुद्धा नारायणगाव येथील एका खाजगी बिल्डरच्या जागेमध्ये हस्तांतरित करण्याचा प्रयत्न सुरू झाला असून महसूल विभागाने तसे आदेश काढले आहेत. परंतु आमच्या गावकऱ्यांचा हे कार्यालय हलवण्यास तीव्र विरोध आहे. दरम्यान सध्या ज्या ठिकाणी कार्यालय आहे ती जागा २३ फेब्रुवारी १९३५ साली जागा मालकाने तहायात करार करून दिलेली आहे. तशी कागदपत्रे उपलब्ध आहेत आणि आम्ही न्यायालयात हे कार्यालय स्थलांतरित करु नये म्हणून जनहित याचिका देखील दाखल केली असल्याचे भुजबळ यांचे म्हणणे आहे. शासनाला ही जागा कमी पडत असेल किंवा काही अडचण निर्माण होत असेल तर आम्ही वारुळवाडी गावातच या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देऊ परंतु कोणत्याही परिस्थितीत हे कार्यालय आमच्या गावच्या हद्दीतून दुसरीकडे स्थलांतरित करू देणार नाही. वारुळवाडीचे सरपंच भुजबळ म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार 24 तारखेला जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून माजी आमदार अतुल बेनके यांच्या समवेत संजय वारुळे, जालिंदर कोल्हे, ग्रामपंचायत सदस्य जंगल कोल्हे, अविनाश घोलप, सौरभ भुजबळ, सचिन अडसरे, दिपक भुजबळ, दत्ता भुजबळ, अनिकेत भुजबळ, वैभव भुजबळ, पप्पू भुजबळ अजित पवारांची भेट घेणार आहोत. तसेच आमदार शरद सोनवणे यांना देखील आमची विनंती आहे की, आपणही वारुळवाडी गावच्या मागे उभे राहून हे कार्यालय आमच्या गावातच राहण्यासाठी आम्हाला मदत करा असे आवाहन त्यांनी केले आहे.

जाहिरात

error: Content is protected !!