नारायणगाव : ( प्रतिनिधी) नारायणगांव पोलीस स्टेशन हद्दीतून जानवारी २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत हरविलेले मोबाईल फोन यांचा तांत्रिक पद्धतीने शोध घेवुन ६ लाख ६ हजार रुपये किंमतीचे विविध कंपण्याचे एकुन २६ मोबाईल फोंन हस्तगत केले असुन ते संबंधीत मोबाईलचे मालकांना देण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी दिली. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर यांनी नारायणगांव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांना सदर मोबाईलचा त्वरित शेाध घेणे कामी योग्य त्या सुचना दिल्या होत्या. सायबर शाखा, पुणे तसेच पोलीस उपनिरीक्षक जगदेव पाटील पोलीस हवालदार संतोष कोकणे यांचे मदतीने नारायणगांव पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार सोमनाथ डोके सत्यम कळकर, सुभाष थोरात, टिलेश जाधव यांनी तांत्रिक विश्लषणाचे आधारे शोध घेवुन झारखंड, पुणे, नाशिक, सोलापुर, संगमनेर, चाकण, तसेच केरळ अशा विविध ठिकाणी संपर्क करून ६ लाख ६ हजार किंमतीचे एकुन २६ मोबाईल यांचा शोध घेवुन हस्तगत केले असल्याचे शेलार यांनी सांगितले.
