उन्हाळ्याची तीव्रता वाढली जुन्नर तालुक्यात शासकीय 10 टँकर सुरू.

WhatsApp

नारायणगाव (प्रतिनिधी) यंदाच्या वर्षी उन्हाळा कडक असल्याने जुन्नर तालुक्यामध्ये सात गाव वाड्या वस्त्यांमध्ये 10 शासकीय टँकर सुरू असून दोन गावांमध्ये नव्याने टँकरची मागणी वाढली असल्याची माहिती प्रभारी गटविकास अधिकारी विठ्ठल भोईर यांनी दिली.
ते म्हणाले की,जुन्नर तालुक्यामध्ये सुकाळवेढे, आंबे कोपरे, मांडवे,जांभूळशी, हडसरची कोटमवाडी, पेठेचीवाडी,देवळे आणे येथील दोन वाड्या, शिंदेवाडी, गुळुंजवाडी या ठिकाणी सध्या शासकीय दहा टँकर सुरू आहेत. नळवणे या ठिकाणी टँकरची मागणी सरपंच अर्चना उबाळे यांनी केली आहे. त्या ठिकाणी सुद्धा तसेच नवलेवाडी, सुरकुलवाडी या ठिकाणी पाण्याच्या टँकरची मागणी करण्यात आली आहे. तिथे देखील लवकरच टँकर सुरू करण्यात येणार असल्याचे भोईर यांनी सांगितले.
दरम्यान उन्हाळ्याची तीव्रता अधिक वाढू लागल्याने टँकरच्या खेपा वाढवाव्या लागणार आहेत. तसेच ज्या गावांमध्ये टँकरची मागणी येईल त्या ठिकाणची तात्काळ पाहणी करून टँकर देखील तातडीने सुरू करण्यात येणार आहेत. काही गावांमध्ये जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जर निर्माण झाला तर त्या ठिकाणी देखील जनावरांच्या पिण्यासाठी टँकर सुरू केले जातील. पिण्याचे पाणी देण्यासाठी शासन कटिबद्ध असून टँकर संदर्भात काही अडचण आल्यास अगर टँकर वेळेवर येत नसल्यास थेट जुन्नर पंचायत समितीशी संपर्क साधावा असे आवाहन प्रभारी गटविकास अधिकारी विठ्ठल भोईर यांनी केले आहे.
दरम्यान जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात काही खाजगी टँकर सुद्धा सुरू असून पूर्व भागात सुद्धा खाजगी टँकर सुरू आहे.

जाहिरात

error: Content is protected !!