लोक कलावंतांसाठी स्वर्गीय विठाबाई नारायणगावकर लोककला आर्थिक महामंडळ स्थापन करावे.

WhatsApp

नारायणगाव (प्रतिनिधी ) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कला व सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र प्रदेश यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार साहेब यांना भेटून राज्यातील लोक कलावंतांसाठी स्वर्गीय विठाबाई नारायणगावकर लोककला आर्थिक महामंडळ स्थापन करावे व तमाशा कला पंढरी नारायणगाव या ठिकाणी विठाबाई नारायणगावकर यांचे स्मारक व्हावे यासाठी निवेदन देण्यात आले.महामंडळ स्थापन झालं तर या सर्व लोककलावंतांना त्या महामंडळातून त्यांच्या मुलांचं शिक्षण, शिक्षणासाठी लागणारे पैसे, त्यांना घरा साठी ,किंवा इतर गरजू वस्तू साठी लोन च्या स्वरूपात पैसे मिळेल, आयुष्यभर कलाकार त्याची कला पूर्णपणे समाजासमोर मांडत असतो मात्र शेवटच्या उतरत्या काळामध्ये त्याचे खूप हाल होतात. महामंडळ स्थापन झाली तर किमान त्याला व तिच्या कुटुंबीयांना तो मदतीचा आधार असेल. म्हणून या कारणांसाठी यासाठी महामंडळ स्थापन करणे गरजेचे आहे.महाराष्ट्रात या खालील लोक कला आहेत सध्या आहेत
लोकनाट्य तमाशा,जागरण गोंधळ, वाघ्या मुरळी, खडीगंमत वगनाट्य, गोंधळी, वासुदेव, पिंगळा, पोतराज, बहुरूपी,कलगीतुरा, भारुड ,पोवाडा, नंदीवाले, दशावतार ,नमन,कोळी नृत्य, डोंबाऱ्याचा खेळ, झाडेपट्टी, वारली चित्रकार, भजन, कीर्तन ,आदिवासी नृत्य,रोडाली, खान्देशी तमाशा, लावणी, संगीत बारी पेंटर इत्यादी लोककला अस्तित्वात आहे. 2006 साली महाराष्ट्रातील पहिला तमाशा महोत्सव नारायणगाव या ठिकाणी झाला असता तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी नारायणगाव या ठिकाणी कृष्णा खोरे महामंडळाच्या दोन एकर जागेवर विठाबाई नारायणगावकर चे स्मारक जाहीर केले होते मात्र अद्याप त्याच्यावर कारवाई झालेली नाही
नारायणगाव ठिकाणी विठाबाईंचे जर स्मारक झाले तर येणाऱ्या पिढीला तमाशा व इतर लोककला समजून सांगता येतील व पाहता येतील या मागचा उद्देश असेल. मुंबई विधान भवनामध्ये सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार व विधान परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे. व राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील प्रदेश उपाध्यक्ष नितीन धवणे पाटील सिने अभिनेत्री अपेक्षा चव्हाण व विठाबाईंचे नातू मोहित नारायणगावकर उपस्थित होते.

जाहिरात

error: Content is protected !!