नारायणगाव: (प्रतिनिधी) जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्यामध्ये गाळप हंगाम 2025-2026 करीताचे मील रोलरचे पुजन कार्यक्रम आज (दि.12) रोजी कारखान्याचे संचालक मंडळ सदस्यांचे उपस्थितीमध्ये संपन्न झाल्याची माहिती विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर यांनी दिली.. यावेळी अध्यक्ष सत्यशिल शेरकर, उपाध्यक्ष अशोक घोलप, सर्व संचालक मंडळ सदस्य, कार्यकारी संचालक भास्कर घुले, सचिव अरुण थोरवे आदिंसह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना सत्यशील शेरकर म्हणाले की, आगामी गाळप हंगाम 2025-2026 साठी मशिनरी देखभाल व दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर असून ऑक्टोबर महिन्यामध्ये विघ्नहर कारखाना गाळपासाठी सज्ज होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर सहवीजनिर्मीती व डिस्टीलरी प्रकल्पांची कामेही वेगामध्ये सुरु आहेत. यंदा ऊस लागवडीकडे शेतकरी वर्गाचा मोठ्या प्रमाणावर कल असल्याचेही ते यावेळी म्हणाले. ऊस उत्पादक शेतकर्यां ना विघ्नहर कारखान्याची बेणे पुरविण्याची प्रक्रिया सुरु असून शेतकर्यां्चा आडसाली ऊस लागवडीकडे मोठ्या प्रमाणावर कल असल्याचे त्यांनी सांगितले. कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता 5000 मे.टना वरुन 7500 मे.टन झाल्याने गाळप हंगाम सन 2025-26 पासुन कारखाना प्रतीदिन 8500 ते 9000 मे.टन ऊसाचे गाळप करणार आहे. तरी ऊस उत्पादक शेतकर्यां नी आडसाली ऊसाबरोबर पूर्वहंगामी व सुरु ऊसाची लागवड ही मोठ्या प्रमाणात करावी, जेणेकरुन ऊस तोडणीचे नियोजन योग्यप्रकारे करता येईल, असेही ते म्हणाले. त्याचप्रमाणे कारखान्यामार्फत हिरवळीचे खत म्हणून ताग बियाणे तसेच विघ्नहर कृषी अमृत सेंद्रिय खताचे वाटप सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. कारखान्याचे सभासद व ऊस उत्पादकांनी याचा आवश्य फायदा घ्यावा, असे आवाहन याप्रसंगी ऊस उत्पादक शेतकर्यांेना केले आहे. ते पुढे म्हणाले की, आगामी गाळपासाठी कारखाना कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड होत असून त्यापासून मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन होणार असल्याने आगामी 2025-2026 च्या ऊस गाळप हंगामात विघ्नहर कारखान्याचे सुमारे 13 लाख मे.टनापेक्षा जास्त गाळपाचे उद्दिष्ठ राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. गळीत हंगामासाठी ऊस तोडणी वाहतुक लेबरचे नियोजना नुसार कराराचे काम चालु आहे. त्याचबरोबर विघ्नहर कारखान्याचा 65 केएलपीडी क्षमतेचा महत्वकांक्षी असा डिस्टीलरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविला जाणार असल्याचे शेरकर सांगितले.