“विघ्नहर” कारखान्याला राष्ट्रीय साखर महासंघ नवी दिल्ली यांचा “उत्कृष्ट ऊस विकास” प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान.

WhatsApp

दिल्ली : (प्रतिनिधी ) नॅशनल शुगर फेडरेशन यांच्या वतीने दिला जाणारा हंगाम २०२३-२४ साठीचा देशातील उच्च साखर उतारा विभागातील उत्कृष्ठ ऊस विकासाचा प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार दिल्ली येथे आज (दि.3)ग्राहक व्यवहार,अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी, आणि नवीकरणीय ऊर्जामंत्री निमुबेन जयंतीभाई बांभनिया तसेच माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर, व्हाईस चेअरमन अशोक घोलप, कार्यकारी संचालक भास्कर घुले, सचिव अरुण थोरवे व सर्व संचालक मंडळ आणि अधिकारी वर्गाने पुरस्कार स्विकारला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर यांनी दिली.

यावेळी साखर उद्योगातील अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते. पुरस्कारांविषयी अधिक माहिती सांगताना सत्यशिल शेरकर म्हणाले की, वसंतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवृत्तीशेठ शेरकर यांनी श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची मुहुर्तमेढ रोवली. विघ्नहर कारखान्यास यापुर्वीही अनेक राष्ट्रीय व राज्य स्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. कारखान्याचे संस्थापक निवृत्तीशेठ शेरकर व सोपानशेठ शेरकर यांचा शेतकरी हित जोपासने व पारदर्शक कारभार याच धर्तीवर विघ्नहर कारखान्याची वाटचाल सुरु असून मिळालेल्या या पुरस्काराने विघ्नहरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असल्याचे त्यांनी सांगितले. शेरकर म्हणाले की, मागील वर्षी कारखान्याची गाळप क्षमता प्रती दिनी ५००० मे. टनावरुन ७५०० मे.टना पर्यंत विस्तारीकरण करण्यात आले असून त्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली. पुढील हंगामाचे गाळपाचे उदिष्ठ १३ लाख मे. टन ठेवलेले असून कारखान्याचे प्रथम पासुनच ८००० ते ८५०० मे. टनापासून ऊसाचे प्रती दिनी गाळप होईल. विघ्नहर कारखान्याचे ऊस लागवडीचे धोरण १ जून २०२५ पासून सुरु झाले असून कारखान्यामार्फत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मागणीनुसार ऊस बेणे, ऊस रोपे व ताग बियाणे यांचा ऊधारीने पुरवठा केला जात आहे. प्रती एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी प्रत्यक्ष ऊस उत्पादकांच्या बांधावर जावून मार्गदर्शन करण्यात येत आहे. एकात्मिक किड नियंत्रण योजने अंतर्गत हुमणी किडीचे भुंगेरे शेतकरी व मजुरांना रोख रक्कम देवुन त्यांच्या कडुन जमा करुन नष्ट केले जातात. हुमणी नियंत्रणासाठी कारखाना जैविक प्रयोगशाळेत तयार केलेली अनेक प्रकारच्या जैव किडनियंत्रक जैविकांचा उधारीने पुरवठा केला जात आहे. व्हिएसआय उत्पादीत ईपीएन मल्टीमायक्रोन्युट्रीयंट व मल्टीमॅक्रोन्युट्रीयंट, वसंत उर्जा व ह्युमिक अॅसिड इ. द्रवरुप खतांचा पुरवठा केला जात आहे. ऊस पिकासाठी ठिबक सिंचन योजना मागील १४ वर्षापासून सातत्याने राबविण्यात येत आहे. कारखाना माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळेमध्ये ऊस पिकासाठी मोफत माती नमुने तपासून रासायनिक खतांची शिफारस दिली जाते. तसेच लागवड हंगाम २०२५-२६ पासून कारखान्यामार्फत कृत्रिम बुध्दिमत्ता (एआय) तंत्रज्ञानावर आधारीत ऊस शेतीचा अवलंब कारखाना बेणे मळा व प्रगतशिल ऊस उत्पादक शेतक-यांच्या शेतावर करणार आहे. लागवड हंगाम २०२५-२०२६ पासून विघ्नहर कृषी अमृत (फर्मेटेड सेंद्रीय खत) ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रती एकरी १० बॅग प्रमाणे ऊस लागवडीसाठी उधारीने पुरवठा करण्यात येत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्यामार्फत स्वखर्चाने व्हिएसआयला आयोजित ज्ञानयाग व ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी तकऱ्यांना दरवर्षी पाठविले जाते. कारखान्यामार्फत प्रती एकरी १०० मे.टन व त्यापुढील ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देवून गौरविण्यात येते. प्रती एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी गावोगावी कारखाना व व्हिएसआय मांजरी बु., यांचे स्तरावर शेतकरी मेळावे आयोजित केले जातात. यामुळे कारखाना कार्यक्षेत्रात प्रती एकरी ऊस उत्पादनात वाढ होत असल्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर यांनी सांगितले.

जाहिरात

error: Content is protected !!