शेतकऱ्यांचा आधारवड कै. केरू शेठ कोंडाजी वेठेकर(बाबा). शिवनेर भूषण , क्रांतीचे शिल्पकार स्व. केरूशेठ कोंडाजी वेठेकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. जुन्नर तालुक्यातील मुंबई विशाखापटनम हायवे लागत असणारे पिंपरी पेंढार गाव माता मळगंगा व रुद्र हनुमान यांच्या पावन भूमीचे उत्तम लेखक, कलाकार, तपस्वी व राजकारणी यांचे मध्यवर्ती व महत्त्वाचे गाव. या गावातील वेठेकर घराणे प्रमुख घटक या घराण्यातील लोक बुद्धिमान ,महत्त्वकांक्षी काटक ,कष्टाळू व धाडसी म्हणून प्रसिद्ध आहेत. या परिवारातील स्व. केरूशेठ वेठेकर सर्वसामान्य शेतकरी ,सदगृहस्थ होते शेत जमीन व शेती करण्यासाठी घरी बैल – बारदाना होता. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या वाचनासम शेठजींचा जन्म पिंपरी पेंढार गावात झाला मोठे कुटुंब कोरडवाहू जमीन कर्जाचा पाश यामुळे कुटुंबाची परिस्थिती हालाखीची होती. शेटजींचे शिक्षण याच गावातील प्राथमिक शाळेत चौथीपर्यंत झाले. त्यांचे अंकगणितात सुरुवातीपासून प्राविण्य होते. उपयोग त्यांना हुंडेकरी व्यवसायात झाला कॅल्क्युलेटर पेक्षाही लाखो रुपयांची बेरीज वजाबाकी करण्याचे त्यांचे कौशल्य वाखण्य जोगे होते. पुढे त्यांचा विवाह गऊ बाई यांच्याशी झाला. या दांपत्यास पुढे त्याचा नावलौकिक वाढविणारी मुले झाली. थोरले श्री रोहिदास केरूशेठ वेठेकर,(पिंपरी पेंढार येथे 35 वर्ष शिक्षक, मुख्याध्यापक म्हणून सेवा केली. वीस वर्ष पिंपरी पेंढार गावचे सरपंच, उपसरपंच म्हणून नेत्र दीपक काम केले, दुसरे श्री सुधाकर केरू शेठ वेठेकर (आदर्श टोमॅटो व भाजीपाला व्यापारी),तिसरे श्री निवृत्ती केरू शेठ वेठेकर (शेती व्यवसायात कार्यरत),चौथे श्री ज्ञानेश्वर केरू शेट वेठेकर (हुंडेकरी व केळी व्यवसाय सांभाळत आहे), पुतणे श्री समीर (शिक्षक), श्री सचिन (शेती व्यवसाय सांभाळत आहेत). त्यांच्या दहा पुतण्या त्यांना उत्तम शिक्षण व संस्कार करून चांगल्या कुटुंबात त्या सर्व गुण्यागोविंदाने नांदत आहेत. त्यापैकी सौ संगीताताई वाघ (पुतणी) यांनी पंचायत समितीचे सभापती पद भूषवले आहे. बाबांचे शिक्षण जरी कमी असले तरी शिक्षण हे वाघिणीचे दूध असल्यामुळे पुढच्या पिढीला, नातवंडांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले नातू १) श्री मनोज रोहिदास वेठेकर (M.D.medicine),२) श्री महेश रोहिदास वेठेकर(तालुका कृषी अधिकारी, नाशिक करतो),३) श्री गणेश निवृत्ती वेठेकर (m.s) अमेरिकेत प्रतिष्ठित कंपनीत कार्यरत४). श्री सुरज सुधाकर वेठेकर (मुंबई येथे व्यवसायात कार्यरत) बाबांनी सर्वच नातेवाईक, सगळे सोयरे, नातवंडे यांना कठोर परिश्रमाचा आदर्श देताना मनापासून प्रेम केले. त्यामुळे त्यांच्यानंतरही सर्व नातेवाईकांचे संबंध दृढमूल आहेत. एकत्र कुटुंब पद्धती आजही कशी आदर्श आहे याचे उत्तम उदाहरण शेठजींनी घालून दिले कुटुंबाची प्रगती करताना कुटुंबाला बसलेले चटके कुटुंबप्रमुख म्हणून त्यांनी सहन केले. त्यामुळे कोणत्याही निर्णय प्रक्रियेत कुटुंबात, गावात बाबांचा शब्द अंतिम होता त्यामुळे कुटुंबाची, गावाची व तालुक्यातील जनतेची प्रगती झाली. तालुक्याचे माजी आमदार श्री वल्लभ शेठ बेनके बाबांचा शब्द प्रमाण मानत होते त्याचप्रमाणे तालुक्याचे आमदार श्री शरद दादा सोनवणे, नेताजी दादा डोके, महादेव शेठ वाघ, अनिल तात्या महेर ही मातब्बर मंडळी त्यांचे कुटुंब बाबांमुळे स्थिरस्थावर झाले हे मान्य करतात. 1966 च्या दुष्काळात सुरुवातीस त्यांनी रस्त्याची व नाला बर्डीनची कामे आपली पत्नी व भावजय यांना बरोबर घेऊन रोजगार हमीच्या कामावर काम केले. तसेच कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी इतर शेतकऱ्यांची अल्प मोबदल्यात बैलांच्या सहाय्याने नांगरणी, पेरणी, पाळी, विहीर खोदणे ही कष्टाची कामे केली. चार माणसे जेवढे काम करतात तेवढे काम शेठ एकटे पोटाला पिळा मारून, हत्तीचे बळ आणून काम करीत अहोरात्र कष्ट करून मिरची सारख्या पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्याचे काम त्यांनी केले. बाबांची शेती पाहून तालुक्यातील कृषी क्षेत्रात पदवीधर असणारे शेतकरी देखील अचंबित होत होते सामान्य शेतकऱ्याची व्यथा त्यांनी जवळून पाहिल्या शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक व शेतमाल बाजारापर्यंत पोहोचवण्यासाठी येणाऱ्या अडचणी व शेतमालाचे होणारे नुकसान व पिळवणूक लक्षात घेऊन त्यांनी हुंडेकरी व्यवसाय सुरू केला. रस्ते व दळणवळण व्यवस्था नसतानाही मिरचीसाठी जळगाव, भाजीपाल्यासाठी मुंबई व टोमॅटो साठी दिल्लीबरोबर इतर राज्यातील बाजारपेठा शोधून शेतकऱ्यांच्या मालाला बाजार भाव देऊन त्यांनी शेतीसाठी भांडवल गरीब मुला मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत, विहीर खोदाई साठी मदत, ट्रॅक्टर खरेदी, आजारपण यात सर्वसामान्यांना शेठ आधारवड होते. सुरुवातीच्या काळात मोठा हा कोण शेती फुलवण्याचे काम बाबांनी केले काळाबरोबर स्वतः सह तालुक्यातील शेतकऱ्यांना डिझेल, इंजिन, विद्युत मोटर, ठिबक सिंचन, टिशू कल्चर केळी या सर्व उत्क्रांतीचे ज्ञान त्यांनी दिले. कमी पाण्यावर ठिबक सिंचन चा आधार घेऊन केळीसारखे नगदी पीक घेण्याचे धाडस सामान्य शेतकरी करू लागले जळगाव धरणातून अनेक उपसा सिंचन योजना, पाईपलाईन करण्यामध्ये अनेक गावातील शेतकऱ्यांना संघटित करून त्यांनी मदत केली. योजना पूर्ण करण्यासाठी शेठ भांडवलाचा पुरवठा करत खऱ्या अर्थाने तालुक्यातील हरितक्रांतीचा पाया घालण्याचे काम त्यांनी केले तालुक्यातील केळी, टोमॅटो ,भाजीपाला या नगदी पिकांना एक वेगळी उंची देण्याचे काम त्यांनी केले दररोज 40-50 ट्रक भाजीपाला व टोमॅटो देशातील वेगवेगळ्या राज्यात पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. गोरगरीब शेतकऱ्यांना हक्काचे मार्केट उपलब्ध करून त्यांचे जीवनमान समृद्ध करण्याचे काम त्यांनी केले. बाबा खरोखर सर्वसामान्यांचे परिस होते. त्यांच्याकडे नेहमी शेतकऱ्यांचा राबता असायचा शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करायचे त्यांच्या सानिध्यात असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे सोने झाले. तालुक्यातील शेतीला उच्च दर्जा देण्याचे गौरवास्पद काम बाबांनी केले बाबांचा गावात व तालुक्यात आदरयुक्त दरारा होता. आबाल वृद्धांपासून सर्वच बाबांना देवदूत मानत होते सामान्य शेतकऱ्याची जमीन जलमय करून शेतकरी बंगल्यात राहतोय ,शेती पूरक व्यवसाय करतोय ,मुला मुलींना उच्च शिक्षण देतोय, यांत्रिक शेती करतोय याचे श्रेय बाबांना जाते. साधी राहणी व उच्च विचारसरणी काय असते याची प्रचिती बाबांकडे पाहून येते. शेतकरी लग्नात कर्जबाजारी होतो हे ओळखून त्यांनी गावात सामुदायिक विवाहाची चळवळ सुरू केली व त्यातून हजारो मोफत सामुदायिक विवाह सोहळे बाबांच्या दातृत्वातून संपन्न झाली सामाजिक जबाबदारी म्हणून मोठेपणा न दाखवता 25 वर्ष ही चळवळ अखंडपणे चालवली. दरवर्षी स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन या दिवशी सर्व विद्यार्थी व गावकरी यांना अन्नदान करण्याचे काम बाबांच्या पुढाकारातून आस्था गायक चालू आहे. त्या काळात बाबा म्हणजे चालती बोलती बँक होती. गरीब श्रीमंत भेद न करता तालुक्यातील सर्व लग्न समारंभ, यात्रा, धार्मिक कार्यक्रम, मंदिरांचा जीर्णोद्धार यामध्ये बाबांचे योगदान फार मोठे होते. मोठेपणा न बाळगता कुठे गेले तरी घरगुती जेवणाचा डबा बरोबर असायचा भाकरी, उडदाची आमटी, शेंगोळी, कारले, लसणाची मिरची ही आवडीचे पदार्थ होते. बाबांनी पंढरपूर येथील धर्मशाळा, देहू येथील गाथा मंदिर, पिंपळवंडी चे मळगंगा मंदिर, खामुंडीचे काळभैरवनाथ मंदिर, काळवाडी चे कालिका माता मंदिर यांसाठी भरीव आर्थिक योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्यात त्यांचे बंधू श्री दशरथ शेठ, श्री शिवाजी शेठ, भगिनी सौ राधाबाई, पत्नी गऊबाई, भावजय सुमनबाई, सौ विमलबाई यांचे सहकार्य लाभले. त्यांनी अखंडपणे मोलाची साथ दिली. त्याचप्रमाणे बाबांच्या मोठ्या सूनबाई सौ सुरेखाताई वेठेकर यांना बाबांचा वचक असल्यामुळे व माजी आमदार वल्लभ शेठ बेनके यांच्या आशीर्वादाने पंचायत समिती जुन्नर येथे उपसभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली व आजही पिंपरी पेंढारच्या सरपंच पदावर त्या कार्यरत आहेत, त्यांची पत्नी सौ संगीताताई वाघ यांना पंचायत समिती सभापती पदावर काम करण्याची संधी बाबांच्या पाठबळामुळे मिळाली हे नाकारता येणार नाही. त्यामुळे तालुक्यातील राजकीय, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक पटलावर वेठेकर कुटुंबाचे नाव आदराने घेतले जाते. बाबांच्या बाबतीत शेवटी एकच म्हणावे वाटते तालुक्यातील खऱ्या अर्थाने हरितक्रांतीचे जनक बाबा साहेब.”कष्ट करा यश तुमचेच आहे”हा बाबांचा मूलमंत्र होता. बाबांचे प्रचंड कार्य भौतिक आर्थिक, सामाजिक ,शैक्षणिक विचारांची शिदोरी व आपले कर्तुत्व येणाऱ्या अनेक भावी पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरतील. शब्दांकन-प्रशांत घुले सर, जयवंत कठाळे सर.
