कलमी टोमॅटोचा यशस्वी प्रयोग. युवा शेतकऱ्याला आले यश.

WhatsApp


नारायणगाव : (प्रतिनिधी) हिवरे तर्फे नारायणगाव येथील युवा शेतकरी सचिन गहीना भोर या युवा शेतकऱ्याने गावठी वांग्यावर कलम केलेल्या टोमॅटोची उन्हाळ्यात लागवड करून टोमॅटोचे पीक दर्जेदार तयार करून इतर शेतकऱ्यापुढे एक नाविन्यपूर्ण व यशस्वी प्रयोग यशस्वी करून दाखविण्यात यश मिळवले आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, जुन्नर तालुक्यातील हिवरे तर्फे नारायणगाव येथील सचिन गहीना भोर या युवा शेतकऱ्याने सव्वा एकर क्षेत्रामध्ये वांग्याच्या झाडावर कलम केलेल्या टोमॅटोची लागवड 8 मार्च 2025 रोजी केली असून सध्याही टोमॅटो दोन महिन्याची झाली असून हा प्रयोग यशस्वी करण्यात या शेतकऱ्याला यश मिळाले आहे. विशेष म्हणजे वांग्याच्या झाडावर कलम करून टोमॅटोची रोपे तयार केलेली लागवड ही उन्हाळ्यात न करता पावसाळ्यात करावी अशी शिफारस असताना देखील या शेतकऱ्याने उन्हाळ्यात या टोमॅटोची लागवड करून टोमॅटोची बाग चांगल्या प्रकारे फुलवली आहे. सध्या टोमॅटोला मोठ्या प्रमाणात फळे आली आहेत. सव्वा एकर क्षेत्रासाठी एवढ्या क्षेत्रासाठी साडेआठ हजार कलम केलेल्या टोमॅटोच्या r लागवड करण्यात आली आहे. एका हुंडीची किंमत दहा रुपये इतकी असून नाशिक येथील रोपवाटिकेतून त्यांनी ही टोमॅटोची रोपे आणली आहेत . गावठी वांग्याच्या झाडाच्या खोडाला कलम करून ही टोमॅटोची रोपे तयार करण्यात आली आहेत. या शेतकऱ्याला ही टोमॅटोची लागवड करीत असताना आजवर एकरी खर्च दोन ते अडीच लाख रुपये झाला आहे . वांग्याच्या झाडावर कलम करून लावलेली ही टोमॅटो साधारण 70 दिवसानंतर सुरू होतात. टोमॅटो लागवड करून 60 दिवस झाले असून दहा-बारा दिवसांमध्ये टोमॅटोचा तोडा सुरू होण्यास सुरुवात होणार असल्याचे भोर यांनी सांगितले. टोमॅटोचा बाग चांगला टवटवीत व तजेलदार असून त्याला फुले व फळे देखील अधिक लागली असल्याचे त्यांनी सांगितले. वांग्याच्या झाडावर कलम करून लागवड केलेली टोमॅटोची झाडे रोगांना बळी पडत नाही. व या झाडांची प्रतिकारक क्षमता अधिकची असते, असा दावा या शेतकऱ्यांनी केला आहे. टोमॅटोची लागवड करण्यापूर्वी दोन गाड्या शेणखत, कोंबड खत एक गाडी, कडू पेंड, औषधांची फवारणी नियमित प्रमाणे केली आहे . या कलमी टोमॅटोची सुरुवातीला वाढ कमी होत असल्यामुळे खताचा मात्र जास्त करावा लागतो.या टोमॅटो तोडणीचा हंगाम सुरू झाल्यानंतर तीन ते चार महिने बाग सुरू राहते. तसेच बाजार भाव कमी जास्त जरी झाला तरी जास्त दिवस टोमॅटो सुरू राहत असल्याने शेतकऱ्याला या कलमी टोमॅटो लागवडीचा अधिकचा फायदा होऊ शकतो असे भोर यांनी सांगितले भोर म्हणाले की, कलम न केलेली टोमॅटोची बागा 50 ते 60 दिवसात सुरू होतात. मात्र कलम केलेली टोमॅटोची बाग उशिरा सुरू होते व अधिक काळ हे टोमॅटोची बाग सुरूच राहते. त्यामुळे शेतकऱ्याला अधिकचे चार पैसे मिळण्यास फायदा होऊ शकतो. दरम्यान अशाच कलमी टोमॅटोची लागवड येडगाव व पिंपळवंडी मध्ये सुमारे दोन लाख रोपांची लागवड करण्यात आली आहे. तसेच हिवरे तर्फे येथील दुसऱ्या एका शेतकऱ्याने 15000 या कलमी टोमॅटो रोपांची लागवड केली आहे. दरम्यान या कलमी टोमॅटोची लागवड मल्चिंग पेपरवर करण्यात आली असून फळाची गुणवत्ता चांगली व टणक असल्यामुळे या टोमॅटोला बाजारभाव जास्त मिळू शकतो असा दावा केला जात आहे तसेच या कलमी झाडांमध्ये रोग प्रतिकारक क्षमता अधिकची असून जास्त दिवस ही टोमॅटो सुरू राहत असल्यामुळे जरी बाजार भाव कमी जास्त झाला तरी यामधून उत्पादन जास्त मिळतं व पर्यायाने शेतकऱ्यांना अधिकचे पैसे मिळू शकतात.

जाहिरात

error: Content is protected !!