तिरंगा रॅलीला नारायणगाव मध्ये मोठा प्रतिसाद. मुस्लिम बांधवही सहभागी

WhatsApp


नारायणगाव : ( प्रतिनिधी ) पहलगाम येथे हिंदूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे सिंदूर मिशनअंतर्गत भारतीय सैनिकांनी प्रति उत्तर देऊन पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले.भारतीय सैन्याने केलेल्या या उल्लेखनीय कामगिरी बाबत नारायणगाव येथे तिरंगा रॅली काढून जल्लोष करण्यात आला. भारतीय जनता पक्षाचे आशिष माळवदकर, माजी जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके, विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे नामदेव खैरे, सेवानिवृत्त लेफ्टनंट उमेश अवचट, उपसरपंच योगेश पाटे, भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष खैरे यांच्या नेतृत्वाखाली या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामदैवत श्री मुक्ताबाई देवी मंदिरापासून तिरंगा रॅलीची सुरुवात करण्यात आली. येथील बाजारपेठेतून तिरंगा रॅली काढण्यात आली होती. ठिकठिकाणी रॅलीचे ग्रामस्थांनी स्वागत केले.बस स्थानक चौकात तिरंगा रॅलीचा समारोप करण्यात आला.यावेळी उपस्थित मान्यवरांनी भारतीय सैन्य दलाचे अभिनंदन करून पाकिस्तानचा निषेध केला. तालुक्यातील सर्व हिंदू संघटना, माजी सैनिक, गुरुवर्य रा.प. सबनीस विद्या मंदिरातील छात्र सैनिक, स्काऊट गाईड चे विद्यार्थी, सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते,पदाधिकारी तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते. दरम्यान या तिरंगा रॅलीमध्ये मुस्लिम बांधव देखील सहभागी झाले होते. भारताला धोका पोहोचवणाऱ्या पाकिस्तानचा मुस्लिम बांधवांनी देखील तेवढे शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला. धरणगाव बस स्थानकावर या तिरंगा रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी भाजपा नेत्या आशाताई बुचके, भाजपा तालुका अध्यक्ष संतोष खैरे नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे, माजी सैनिक विक्रम अवचट, आशिष माळवतकर, नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी आपले मनोगत व्यक्त करून भारतीय सैन्याच्या कामगिरीचं कौतुक केले.

जाहिरात

error: Content is protected !!