चोरट्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र केले लंपास.

WhatsApp

वारूळवाडी : (प्रतिनिधी) पती समावेत मोटरसायकलवर बसून घरी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रातील सुमारे एक तोळे वजनाचे सोने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना सोमवारी (14) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास वारुळवाडी(ता. जुन्नर) येथील वृंदावन पार्क सोसायटी जवळ घडली. या बाबतची तक्रार ममता सतीश तंवर( वय 54, राहणार वारुळवाडी, वृंदावन पार्क सोसायटी) यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. ममता तंवर यांनी नारायणगाव येथील मीनथडी जत्रेत भेळ विक्रीचा स्टॉल लावला होता. सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्या पती सतीश तंवर यांच्या समावेत मोटरसायकलवरून घरी निघाल्या होत्या. दरम्यान हेल्मेट घालून मोटरसायकलवर आलेल्या तरुणाने वारूळवाडी येथील सुयोग सोसायटी जवळ त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्राला हीसका मारला. यामुळे दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र तुटले. यापैकी मंगळसूत्रातील एक तोळा सोने घेऊन चोरटा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. दरम्यान नारायणगाव परिसरामध्ये भुरट्या चोऱ्या वाढू लागले आहेत. काही दिवसापूर्वी नारायणगाव बस स्थानकातून एका महिलेचे दागिने चोरट्याने हिसकावून नेले होते. तसेच पाकीट मारीच्या देखील घटना होऊ लागल्याने पोलिसांनी सतर्क राहावे अशी मागणी केली जात आहे. नारायणगाव ची यात्रा 24 एप्रिल पासून सुरू होत आहे त्यावेळी नारायणगाव मध्ये मोठी गर्दी होत असते या गर्दीचा फायदा घेऊन चोरटे दागिने व पैशावर डल्ला मारू शकतात त्या अनुषंगाने पोलिसांनी उपाययोजना करणे अपेक्षित आहे.

जाहिरात

error: Content is protected !!