नारायणगाव: ( प्रतिनिधी) अभिनेत्री शर्मिला राधिका राजाराम शिंदेला अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या वतीने दिला जाणारा यंदाचा व्यावसायिक श्रेणीतील ‘सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री पुरस्कार’ नुकताच मुंबईत राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते मुंबईत प्रदान प्रदान करण्यात आलाय. शर्मिलाचे मूळ गाव जुन्नर तालुक्यातील खोडद येथील असून गावकऱ्यांनी तिचे अभिनंदन केले आहे.निर्माते चंद्रकांत लोकरे यांच्या ‘ज्याची त्याचि लव्ह स्टोरी’ या नाटकात शर्मिलाने विनोदी भूमिका साकारली आहे.या नाटकाचे दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव आहेत तर लेखक ऋषिकांत राऊत आहेत. विशेष म्हणजे याच नाटकासाठी शर्मिला शिंदेला यंदाचा सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री ‘झी नाट्य गौरव’ पुरस्कार सुद्धा मिळाला आहे.याशिवाय या वर्षीचा महाराष्ट्र शासनाचा मराठी व्यावसाईक नाट्यस्पर्धेचा पुरस्कार पण जहिर झाला आहे तो सुद्धा लवकरच शर्मिलाला प्रदान करण्यात येणार आहे.या पुरस्कारा बद्दल शर्मिलाने समाधान व्यक्त केले आहे.