पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केले म्हणून आमदार शरद सोनवणे यांना विधानसभा अध्यक्ष कार्यालयाकडून नोटीस.

WhatsApp

नारायणगाव : ( प्रतिनिधी ) जुन्नर तालुक्यातून अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार शरद सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांचे विरोधात पक्षांतर बंदी कायद्या आधारे त्यांची आमदारकी रद्द करावी म्हणून अॅड विजय कुऱ्हाडे यांनी विधानसभा अध्यक्ष यांचेकडे तक्रार दाखल केली आहे,त्यानुसार आमदार सोनवणे यांना उत्तर देण्यासाठी नोटीसीची बजावणी करण्यात आली आहे.मे महिन्यत ही तक्रार सर्व पुराव्यांनीशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचेकडे करण्यात आली आहे. आमदार शरद सोनवणे यांच्या विरोधात तक्रारी अर्ज दाखल केल्याने आता आमदार सोनवण् यावर काय बाजू मांडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान आ. सोनवणे म्हणाले की मी अपक्ष निवडून आलो असलो तरी सहयोगी सदस्य म्हणून मी या सरकारला बाहेरून पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मी राज्यात सत्तेत असलेल्या राजकीय पक्षांच्या व्यासपीठावर जाऊ शकतो. मला नोटीस आले आहे ते मी खिशात ठेवले आहे. पाच वर्षे काहीच होणार नाही, असे त्यांनी सांगितले दरम्यान जुन्नर तालुक्याच्या आमदारपदी अपक्ष उभे राहून निवडून आलेले शरददादा सोनवणे हे नारायणगाव येथील मेळाव्यात शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथराव शिंदे यांचे उपस्थितीत शिवसेना पक्षात दाखल झाले,तो सोहळा सर्वानी पाहीलेला आहे,या मेळाव्यात अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केलेला होता,परंतू आमदार शरददादा सोनवणे हे अपक्ष निवडून आल्या नंतर त्यांनी सरकारला पाठिंबा दिलेला होता ते सहयोगी सदस्य सरकार मधील होते,त्यांनी तशी भूमिका स्पष्च केली होती,शिवाय निवडुन आल्यावर त्यांना लगेचच शिवसेना पक्षाचे सचिव रामशेठ रेपाळे यांनी हेलिकाॅप्टरने मुंबईला नेले होते,मंत्रीपदी वर्णी लागेल या अपेक्षा असताना प्रत्यक्षात मंत्रीमंडळात स्थान मिळाले नाही,परंतू शिवसेना पक्षासोबत जाण्याचा त्यांना मनोदय ते सतत बोलून दाखवत होते. पक्षांतर बंदी कायद्यातील दहाव्या परिशिष्टात विधानसभा सदस्यांच्या अपात्रतेबाबत कलम दोन मधील उपकलम दोन नुसार कोणत्याही अपक्ष निवडून आलेल्या सदस्याने निवडणूकिनंतर कुठल्याही राजकिय पक्षात प्रवेश केला तर तो निरर्ह (आमदार की रद्द होईल) होईल अशा प्रकारची स्पष्ट तरतूद असल्याने कारवाई करण्याचे संपूर्ण अधिकार विधानसभाध्यक्ष यांचे आहेत,त्यांचेकडे सर्व पुरावे जोडून तक्रार याचिका दाखल झाल्याने प्रकरण कुठल्या वळणावर जातेय ते पहाणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान आमदार सोनवणे यांचेशी संपर्क साधला असता असता ते म्हणाले की, मी केवळ व्यासपिठावर गेलो होतो मी कुठल्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. मी अपक्ष म्हणून निवडून आलो आहे. निवडून आल्यावर मी राज्यात सत्तेत आलेल्या सरकारला सहयोगी सदस्य म्हणून पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सत्तेत सहभागी झालेल्या राजकीय पक्षांच्या व्यासपीठावर मी जाऊ शकतो. मला विधानसभा अध्यक्ष कार्यालयाकडून दोन नोटीसा आलेले आहेत. परंतु मी कोणतेही चुकीचे कृत्य केले नाही त्यामुळे आमदारकी रद्द होण्याचा प्रश्न येत नाही. दरम्यान ऍड विजय कुऱ्हाडे यांनी तक्रार अर्ज सोबत जोडलेले पुरावे व नोटीस दिल्या नुसार विहीत वेळेत आमदार सोनवणे यांना म्हणणे दाखल करणे क्रमप्रप्त आहे,आता आमदार सोनवणे हे काय म्हणणे सादर करणार?व विधानसभाध्यक्ष काय कार्यवाही करणार? याकडे जुन्नर तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

जाहिरात

error: Content is protected !!