मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सावरगावात पार पडले रक्तदान शिबिर संपन्न.

WhatsApp


नारायणगाव : ( प्रतिनिधी ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने महाराष्ट्रभर रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.संपूर्ण राज्यात जवळजवळ 1000 ठिकाणी भव्य रक्तदान शिबिरे पार पडली असून जुन्नर तालुक्यातील सावरगाव या ठिकाणी सुद्धा आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या वाढदिवसाचे फ्लेक्स लावू नका अशा प्रकारचे निर्देश कार्यकर्त्यांना दिले होते आपापल्या परिसरात रक्तदान शिबीर घ्या अशाही सूचना केल्या होत्या.नारायणगाव-सावरगाव मंडलच्या वतीने सावरगाव या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात 59 जणांनी रक्तदान केले.

यावेळी विधानसभा प्रमुख आशाताई बुचके, तालुका भाजपा अध्यक्ष संतोष नाना खैरे, नारायणगाव- सावरगाव मंडल अध्यक्ष आशिष माळवदकर,युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गणेश कवडे, डॉ. पंजाब कथे, सावरगाव लोकनियुक्त सरपंच दीपक बाळसराफ, धामणखेल सरपंच अभिषेक वर्पे, येणेरे सरपंच अमोल भुजबळ, राजेंद्र चव्हाण, विनोद भगत, अमित आवटी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.साहिल लहानाळे, डॉ. अश्विनी खोमणे, उमेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना भाजपच्या नेते आशाताई बुचके म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून सामान्य जनतेला मोठा आधार निर्माण झाला आहे. ग्रामीण भागाचा विकास व्हावा तेथील प्रश्न मार्गी लागावेत असा अट्टाहास स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांचा असतो. ते मुख्यमंत्री असले तरी सामान्य माणसाला त्यांना सहज भेटता येते. देशात नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्याने परकीय देश आपल्याकडे तिरक्या नजरेने पाहू शकत नाही. सावरगाव, बस्ती निमगाव तर्फे महाळुंगे पारुंडे कुसूर, खानगाव या परिसरातील विकास अधिक प्रमाणात मार्गी लावण्याचा माझा नेहमी प्रयत्न राहिलेला आहे. मी जिल्हा परिषद सदस्य असताना आमदारांपेक्षा जास्त निधी आणला आहे. भविष्यकाळात सुद्धा या भागातील जनतेचे प्रश्न आणि अडचणी सोडवण्याचा माझा प्रयत्न माझ्या रक्तात शेवटचा थेंब असेपर्यंत मी करीत राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष संतोष खैरे, आशिष माळवतकर आदींनी आपले विचार व्यक्त केले. तालुका प्रमुख संतोष खैरे म्हणाले की, महाराष्ट्र मध्ये देवेंद्र फडणवीस एक कणखर मुख्यमंत्री राज्याला लाभला आहे. त्यांच्या कामाचा झपाटा पाहता आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मोठी ऊर्जा मिळते. जुन्नर तालुक्यामध्ये भाजपची फळी चांगली निर्माण झाली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात भारतीय जनता पक्ष चांगली आघाडी घेईल असा मला आत्मविश्वास आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष माळवदकर यांनी केले. उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार सावरगाव सरपंच दीपक बाळसराफ यांनी मानले.

जाहिरात

error: Content is protected !!