नारायणगाव : ( प्रतिनिधी )
शरद सोनवणे पुन्हा विधानसभेत दिसता कामा नये : तो “बदला” माणूस: संजय राऊत यांची टीका
अजित पवारला काय सोनं लागलं आहे का ? शरद सोनवणे यांच्या आडनावातच सोनं आहे मात्र तो बदनाम माणूस आहे. शिवसेनेची चाळीस हजार मते त्याला पडली. म्हणून तो आमदार झाला.तो जर अपक्ष राहिला असता तर माफ केले असते.तो एकनाथ शिंदे यांच्या पक्षात गेल्याने त्याला आता माफ करू नका. शरद सोनवणे पुन्हा विधानसभेत दिसता कामा नये. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा आमदार आपल्याला करावाच लागेल. यापुढे कोणतीही सेटलमेंट होणार नाही. आगामी जिल्हा परिषद,नगरपालिका विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा. असा आदेश शिवसेनेचे प्रवक्ते,खासदार संजय राऊत यांनी पक्ष कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना दिला.
नारायणगाव येथील जयहिंद मंगल कार्यालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या आयोजित मेळाव्यात खासदार राऊत यांचे घानाघती भाषण झाले.
या वेळी शिवसेना उपनेते आमदार सचिन आहेर, शिवसेना उपनेते बबनराव थोरात, जिल्हाप्रमुख सुरेश भोर, आदित्य शिरोडकर, जुन्नर तालुका संपर्कप्रमुख दिलीप बामणे उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी, भांडुपच्या नगरसेविका दीपमाला बढे, मनोज पुंडे, जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, शिवसेना जिल्हा महिला संघटक ज्योत्स्ना महाबरे, माजी जिल्हाप्रमुख सुनील मेहेर, बाबा परदेशी, मंगेश काकडे, भास्कर घाडगे, शरद चौधरी,सुधीर खोकराळे, सह संपर्कप्रमुख संतोष जाधव, मयूर गुंजाळ, शांताराम सावंत, कावा गागरे, दिलीप वाजगे, रोहिदास तांबे, रशीद इनामदार, मोहन बांगर, विजय बनकर, गणेश तांबे, व तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार संजय राऊत यांनी आपल्या भाषणात
उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली. ते म्हणाले अजित पवार एकनाथ शिंदे हे त्यांच्या पक्षाचे नेते नाहीत. अमित शहा त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. मराठी माणसाला संपवण्यासाठी मुंबई गिळंकृत करण्याचा डाव अमित शहा यांचा आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्ष फोडण्याचे काम केले आहे. शिवसेना पक्ष संघर्षातून उभा राहिला आहे. आपण विरोधी पक्षात आहोत याचे कार्यकर्त्यांनी भान ठेवून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर या. विधानसभेची उमेदवारी शरद पवार यांच्याकडे आम्ही मागितली होती. मात्र महाविकास आघाडीचा धर्म टिकवण्यासाठी ही उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसला दिली. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालेल्या 64 हजार मतापैकी शिवसेनेची चाळीस हजार मते आहेत. सोनवणे यांना मिळालेल्या मतापैकी 40 हजार मते शिवसेनेची आहेत. तालुक्यात 80 हजार शिवसेनेची मते असून जुन्नर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. 2029 च्या निवडणूकित जुन्नरची जागा शिवसेना लढवणार आहे. जुन्नरवर भगवा फडकवणार हे निश्चित आहे. आ. सचिन आहीर म्हणाले की, आगामी
जिल्हा परिषद,नगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागा. शिवसेनेची ताकद दाखवून द्या. काही लोकांनी स्वार्थासाठी दुसरा झेंडा खांद्यावर घेतला आहे. शेतकऱ्यांची सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करा. यावेळी बबनराव थोरात यांनी मनोगत व्यक्त केले.