नारायणगाव (प्रतिनिधी )बसस्थानक चौकातील वाहतूक पोलिस वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्त्यावर उभे राहून आपले कर्तव्य बजावत असतात. भर पावसातही त्यांना आपले काम व्यवस्थित पणे करता यावे यासाठी दिनांक 21 मे 2025 रोजी नारायणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते हर्षल भाऊ वाजगे यांच्या वतीने वाहतूक पोलीसांना रेनकोट भेट वस्तू म्हणून देण्यात आले व गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
जुन्नर उपविभागीय अधिकारी रविंद्र चौधर व नारायणगांव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या हस्ते या रेनकोटचे वाटप नारायणगाव पोलिस स्टेशन याठिकाणी करण्यात आले.
वाहतूक पोलिसांना ऊन वारा पाऊस या तिन्ही ऋतूत रस्त्यावर उभे राहून वाहतूक सुरळीत करावी लागते. पावसाळ्यातही पावसाची तमा न बाळगता वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांना करावे कार्य लागते. त्यामुळे त्यांना रेनकोट देण्याची कल्पना सुचली असे हर्षल वाजगे यांनी सांगितले.
वाहतूक पोलीस काळुराम मासाळकर व वाहतूक वार्डन मुनाप पिंजारी, राम भालशिंगे, त्रिशरण सोनवणे, सुदीप आढाव, विजय नेहरकर, अनिकेत नेवकर,जगन्नाथ कांबळे, संकेत भागवत या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, सहायक पोलीस निरीक्षक. महादेव शेलार यांच्या हस्ते रेनकोट चे वाटप करण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते हर्षल वाजगे, आकाश बोरकर, विशाल बाणखेले, गणेश शिंदे, अजिंक्य दळवी ,
सुरज काळे, यश शिंदे, अभय पाटे तसेच हर्षल वाजगे यांचा मित्र परिवार, नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांनी जनता आणि पोलीस यांच्यातील सुसंवाद का असावा याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले!तसेच साहेब पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी हर्षल वाजगे आणि मित्र परिवार यांचे आभार मानले.