स्थानिक संस्थाच्या निवडनुका चार महिन्यात घेण्याचे फर्मान कोर्टाने काढल्याने राजकीय हालचाली वाढल्या.

WhatsApp


नारायणगाव : (प्रतिनिधी) “स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चार महिन्यात घ्या” असे सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्याने जुन्नर तालुक्यातील राजकीय पक्षाच्या हालचाली वाढल्या असून इच्छुक मंडळींच्या पक्षाच्या नेत्यांकडे फेऱ्या वाढू लागल्या आहेत. जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मजबूत आहे. परंतु विधानसभा निवडणुकीत अतुल बेनके यांचा पराभव झाल्याने या पक्षाची ताकद काही प्रमाणात कमकुवत झाली आहे. अपक्ष निवडून आलेले आमदार शरद सोनवणे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी घरोबा केला आहे. परंतु या पक्षाची तालुक्यात फारशी ताकद नाही. आशाताई बुचके भाजपात गेल्याने या पक्षाला तालुक्यात तरतरी आहे. परंतु पक्षाची ताकद म्हणावी अशी नाही.त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत या पक्षाला फारच मेहनत घ्यावी लागेल. जुन्नर तालुक्यात काँग्रेसची ताकद फारशी नाही. या पक्षाचे युवा नेते विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर विधानसभा निवडणुकी दरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे हा पक्ष सध्या जुन्नर तालुक्यात नावापुरता राहिला असल्याचे दिसून येत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला माणणारे कार्यकर्ते जुन्नर तालुक्यात अधिक आहे. परंतु याचे रूपांतर मतात होणे अपेक्षित आहे. या पक्षाचे तालुक्यात नेते जर सक्रिय झाले तर निवडणुकीत रंगत आणू शकतात. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद तालुक्यात मजबूत आहे. परंतु पक्ष फाटाफूटी नंतर या पक्षाचे कार्यकर्तेही फारसे सक्रिय दिसत नाही. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका युती व आघाडी करून लढावीणार की सगळे पक्ष वेगवेगळे लढणार? पक्षाच्या नेत्यांचा आदेश काय येतोय हे देखील महत्वाचे असणार आहे. जुन्नर नगरपरिषद, जुन्नर पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका पुढ्यात आहेत. या स्थानिक संस्थावर प्रशासक असल्याने सामान्य जनतेची कामे मोठ्या प्रमाणात रेंगाळली आहेत. संबंधित संस्थेचे प्रमुखच त्या संस्थेवर प्रशासक म्हणून नियुक्त केल्याने सामान्य लोकांची कामे तातडीने मार्गी लागत नाहीत. या संस्थावर सदस्य नसल्याने तक्रार कोणाकडे करायची? असा प्रश्न या जनतेला आहे. दोन वर्षाहून अधिक काळ या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पुढे ढकलल्या जात होत्या. आता कोर्टाचे फर्मान आल्याने सगळेच राजकीय पक्ष उमेदवारांची चाचपनी करू लागले आहेत. जुन्नर नगर परिषदेची सत्ता या आगोदर शिवसेनेकडे होती. शाम पांडे हे सेनेचे नगराध्यक्ष होते. परंतु सध्या दोन शिवसेना झाल्याने या निवडणुकीत दोघांनाही कसरत करावी लागणार आहे. अपक्ष आमदार शरद सोनवणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले असले तरी या संस्थेत सत्ता मिळविण्यासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे. जुन्नर नगर परिषदेचेत एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त नगरसेवक निवडून आले होते. आता राष्ट्रवादी एकसंघ न राहिल्याने या दोन्ही पक्षांना खूप कसरत करावी लागणार आहे. दरम्यान जुन्नर पंचायत समितीची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती एकखाती होती. या निवडणुकीत कोणता पक्ष कोणाबरोबर युती व आघाडी करील यावर पुढील गणितं अवलंबून असणार आहे.

जाहिरात

error: Content is protected !!