पिंपळवंडीच्या मळगंगा यात्रा उत्सवाला मोठा प्रतिसाद. बैलगाडा शर्यतीला देखील नामांकित बाऱ्यांची हजेरी.

WhatsApp

नारायणगाव :(प्रतिनिधी) पिंपळवंडी येथे आयोजित केलेला मळगंगा मातेच्या यात्रा उत्सवाला मोठा प्रतिसाद लाभत असून लाखो भाविक भक्तांनी मळगंगा मातेचे दर्शन घेण्याचा लाभ घेतला. अतिशय जागृत देवस्थान असल्यामुळे पिंपळवंडी व परिसरातील बारा वाड्यामधील जी लोकं नोकरी निमित्त मुंबई पुणे या ठिकाणी आहेत या सगळ्यांनी गावाला येऊन यात्रेचा आनंद लुटला.  देवीचे चोळी,पातळ काठी मिरवणूक, बैलगाडा शर्यत कुस्त्यांचा आखाडा तसेच मनोरंजनासाठी तमाशा व आर्केस्ट्रा आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.     मळगंगा मातेच्या यात्रेचा आजचा दुसरा आणि महत्त्वाचा दिवस सकाळी काठीची मिरवणूक मांडव डहाळे शेरनी आधी कार्यक्रम संपन्न झाले सकाळपासूनच मळगंगा मातेच्या दर्शनासाठी भाविकांची रांग लागली होती. दर्शनाला आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून देवस्थान ट्रस्ट व गावातील स्वयंसेवकांनी चोख बंदोबस्त ठेवला ठेवला आहे.     यात्रेमध्ये विविध प्रकारची खेळणी, साहित्य रसाचे दुकाने आईस्क्रीम कुल्फी विक्रीसाठी उपलब्ध होती. कोणाचा तडाका अधिक असल्याने उसाचा रस व सरबत यावर आलेल्या लोकांचा अधिकचा भर पाहायला मिळाला. बैलगाडा शर्यतीचा आजचा शेवटचा वाखरीचा दिवस असून दोन दिवसांमध्ये 300 हून अधिक बैलगाडी या शर्यतीमध्ये सहभागी झाले आहेत. सूर्य अक्षरशा आग ओकत असताना देखील बैलगाडा शौकिनांची गर्दी मात्र चांगलीच झाली होती.    बुधवार(दि.23) हा यात्रेचा अखेरचा दिवस असून या दिवशी सकाळी तमाशाची हजेरी व दुपारी चार नंतर कुस्त्यांचा जंगी आखाडा भरविण्यात येणार आहे. या कुस्तीच्या आखाड्यामध्ये राज्यातून नामांकित मल्ल सहभागी होणार आहेत. दरम्यान उन्हाळा कडक असला तरी यात्रेमध्ये भाविकांची व बैलगाडा शोकरांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. जुन्नर चे आमदार शरद सोनवणे यांच्या प्रयत्नांमधून पिंपळवंडी येथे बैलगाडा शर्यतीचा घाट चांगल्या पद्धतीने तयार केला असल्यामुळे यावर्षी बैलगाडा शर्यतीला मोठा प्रतिसाद लाभत असून तब्बल दोन दिवस बैलगाडा शर्यतीचे आयोजन केलेले आहे या शर्यतीमध्ये दोन दिवसात 300 बैलगाडी पळाले आहेत. बैलगाडा शर्यतीमध्ये नंबर पटकावणाऱ्या गाडा मालकांना रोग बक्षिसे ट्रॅक्टर आधी बक्षिसे देण्यात येणार आहेत.

जाहिरात

error: Content is protected !!