विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा
दि.०४/०५/२०२६ रोजी रात्री ९:०० वा चे सुमारास सौ. साक्षी विशाल भागवत, रा. पारगाव, लबडेमळा, ता. आंबेगाव, जि. पुणे या विवाहित मुलीच्या तिच्या सासरच्या व्यक्तींसमवेत असताना मुलीचे वडील व इतर ६ जन यांनी मारहाण करून, शिवीगाळ व दमदाटी करत जबरदस्तीने एस. क्रॉस व स्विफ्ट वाहनांमध्ये टाकून अपहरण केले. सदर आरोपींचा उद्देश फिर्यादीस जबरदस्तीने दुसरे लग्न लावून देणे हा होता.
घटने नंतर पारगाव कारखाना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तात्काळ हालचाल केली. घटनेनंतर अवघ्या ४ तासांच्या आत सर्व ७ आरोपींना वेगवेगळया ठिकाणांहून अटक करण्यात आली.
पारगाव कारखाना पोलीस ठाणे येथे सदर आरोपींचे विरूध्द भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ८७, ११५(२), १८९(२), १९०, १९१(२), ३५२, ३५१(२) (३) कलमांन्वये गुन्हा क्र. ४२/२०२६ नोंद करण्यात आला असून अटक करण्यात आलेले आरोपींची नावे १) शिवाजी भाऊ खाटेकर वय ४५ वर्षे रा पारगाव, वैदवाडी फाटा, ता.आंबेगाव, जि.पुणे. २) अमोल चांगदेव रोडे, वय ३३ वर्षे ३) सचिन रावसाहेब रोडे, वय २९ वर्षे ४) अक्षय विश्वानाथ वाडगे, वय २९ वर्षे ५) अभिजीत बारकु रोडे, वय २६ वर्षे ६) नंदकिशोर विलास तितर, वय ३२ वर्षे सर्व रा. नांदुर खंदरमाळ, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर ७) जयश्री अशोक कुटनर वय ३५ वर्षे रा. साकोर, ता.संगमणेर, जि. अहिल्यानगर अशी आहेत.
सदरची कामगिरी मा. संदीप सिंह गिल्ल सोो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, श्री. रमेश चोपडे सोो, अपर पोलीस अधीक्षक पुणे विभाग, मा.अमोल मांडवे सोो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड विभाग, खेड यांचे मार्गदर्शनाखाली श्री. सचिन कांडगे सहा. पोलीस निरीक्षक पारगाव का. पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पोलीस हवालदार अविनाश कालेकर, सचिन डामसे, पोलीस अंमलदार संजय साळवे, मंगेश अभंग, चंद्रकांत गव्हाणे, प्रशांत जगताप, महिला पोलीस अंमलदार काजल फलके यांनी केली.