अंगारकचतुर्थी दिनी घेतले हजारो भाविकांनी श्री विघ्नहराचे दर्शन.

WhatsApp

विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा अष्टविनायकातील मुख्य स्थान असलेल्या श्री क्षेत्र ओझर येथे पहाटे ४ वाजता श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष श्री बाळकृष्ण कवडे,उपाध्यक्ष तुषार कवडे,सचिव सुनील घेगडे,खजिनदार दत्तात्रय कवडे विश्वस्त सुर्यकांत रवळे,प्रकाश मांडे,संतोष कवडे,गोविंद कवडे, विलास कवडे,शिल्पाताई जगदाळे यांच्या शुभहस्ते श्रींना महाअभिषेक पूजा करून दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.मंदिरामध्ये चतुर्थी निमित्त महाआरती करण्यात आली. महाआरतीचा मान विक्रम गिलबिले , मा रविंद्र कवडे , सुजय पारवे , रोशन चौधरी, संतोष सुर्यवंशी, संदेश भेके , विवेक खिल्लरी, उद्योजक सुरेंद्र वधवा, एपीआय ज्ञानेश्वर बाजगिरे , बुधाजी शिंगाडे ह्या अकरा मान्यवरांना महाआरतीचा मान मिळाला. त्यांचे आभार श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष बाळासाहेब कवडे यांनी मानले.
पहाटे चार ते रात्री अकरा वाजे पर्यंत रांगेत सुमारे दिड लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. सकाळी ७.०० वा. व दुपारी १२.०० वा. मध्यान्ह आरती करण्यात आली. सकाळी ८.०० वा. नियमित पोथी वाचन करण्यात आले.सकाळी १०.३० वा.’’श्री” स नैवद्य दाखवून भाविकांना खिचडी वाटप श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट च्या वतीने करण्यात आली. आज अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्ताने विघ्नहर मंदिरात फुलांची आरस विघ्नहराला रेशमी जरीचा पोशाख करण्यात आला होता. तसेच सोन्याचे अलंकार श्री विघ्नहराला परिधान करण्यात आले. विघ्नहर्ता गणेशापुढे ५०१ आंब्याची आरस श्री गिरीष भोर तसेच शिवाजी आणि विजय मुळे यांनी १०१ किलो पेरू आरस बनविण्यासाठी दान दिले . येणाऱ्या भाविकांसाठी मंदिरात दर्शनरांग,पाणी पिण्याचे व्यवस्था,अभिषेक व्यवस्था. देणगी कक्ष ,अभिषेक करण्यासाठी शमी वृक्षाखाली व्यवस्था,चप्पल stand पार्किंग, दर्शन रांगेत उष्णतेपासून बचाव करण्यासाठी दर्शन रांगेवर पाण्याची तुषार सिंचन करण्यात आली होती .कमीत कमी वेळेतील दर्शनासाठी मुखदर्शन व्यवस्था इत्यादी व्यवस्था करण्यात आली. तसेच पार्किंग तळावरील 100 बाय 200 चे पत्राशेडचा भाविकांनी उपयोग करून घेतला .सायंकाळी ७.०० वा. नियमित हरिपाठ करण्यात आले. व चंद्रोदयापर्यंत कीर्तनकार ह.भ.प. मयुर महाराज बोडके ओझर यांचे हरिकीर्तन झाले.त्यांना साथसंगत श्रीराम प्रसादिक भजनी मंडळ शिरोली यांनी दिली. आजचे अन्नदाते श्री कुंडलिक रामजी मांडे ,ओझर यांनी चतुर्थीचे वारकरी अन्नदान केले रात्रौ १०.३० वाजता शेजआरती करून ११.०० वाजता मंदिर बंद करण्यात आले. आजच्या महाआरतीच्या मानकरी यांनी विकास कामात सहभागी होवून ट्रस्ट ला देणगी दिली. विक्रम गिलबिले २१०००/-, राजाराम नथू मांडे २१०००/- आलेल्या भाविकांचे स्वागत देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष बाळासाहेब कवडे ,उपाध्यक्ष तुषार कवडे,सचिव सुनील घेगडे,खजिनदार दत्तात्रय कवडे,विश्वस्त, प्रकाश मांडे , सुर्यकांत रवळे, गोविंद कवडे ,विक्रम कवडे, समिर मांडे , विनायक मांडे , संतोष कवडे , विलास कवडे , विनायक जाधव, मंगेश पोखरकर,सौ.शिल्पा जगदाळे, यांनी केले. गर्दीचे नियोजन देवस्थान ट्रस्ट चे व्यवस्थापक व कर्मचारी यांनी केले

जाहिरात

error: Content is protected !!