नारायणगाव : (प्रतिनिधी ) श्री क्षेत्र ओझर,ता.जुन्नर येथे शनिवार (दि १४) रोजी संकष्टी चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र राज्यातील प्रथमच अंध व्यक्तींचा शाही सामुदायिक विवाह सोहळा भाजपा पुणे जिल्हा युवा मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष व अश्वमेघ युवा मंचचे संस्थापकअध्यक्ष गणेश कवडे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला होता.
या विवाह सोहळयाची सुरुवात रूढी परंपरेनुसार मांडवडहाळे व त्यानंतर साखरपुड्याच्या मिरवणूकीने झाली.ही मिरवणुक श्री क्षेत्र ओझर येथील लेझीम पथकाद्वारे पारंपरिक वाद्यात संपन्न झाली.तसेच महिला भजन मंडळाची व ब्रास बॅन्डची सुंदर साथ या मिरवणुकी दरम्यान मिळाली.
तसेच या विवाह सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश पुजनाने झाली.श्री गणेश पुजन श्री क्षेत्र ओझर येथील सर्व संस्थांचे आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.सदर सामुहिक विवाह सोहळ्यात महाराष्ट्र राज्यातील ५ अंध वर – वधू सहभागी झाले होते.टिळा व साखरपुडा कार्यक्रमाची सांगता वर-वधूंच्या आम्ही स्त्रीभ्रूण हत्या करणार नाही अशी सामुहिक शपथ घेऊन झाली.श्री क्षेत्र ओझर येथे अनेक वर्षांपासून सामुदायिक विवाह सोहळा वेळेत व पारंपरिक पद्धतीने साजरा होतो.
दुपारच्या सत्रात भोजन समारंभ व हळदी समारंभ संपन्न झाला.त्यानंतर वर वधुंची मिरवणुक शाही थाटात म्हणजे विंटेज कार व पाच लक्झरी कार्स मध्ये संपन्न झाली.या मिरवणुकीदरम्यान झांज पथक,ताशा पथक,ब्रास बॅन्ड व महिला लेझीम पथकाची सुंदर साथ मिळाली.
प्रसंगी महाराष्ट्र राज्यातील सांप्रदायिक,सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांचे शुभाशीर्वाद या अंध दांपत्यांस मिळाले.
या शाही विवाह सोहळ्यास अश्वमेघ युवा मंचच्या माध्यमातून कन्यादानाच्या स्वरूपात प्रत्येक वधूस सोन्याचे मंगळसूत्र, वधू व प्रत्येकी तीन पोशाख,देवघरापासून ते संपूर्ण संसारउपयोगी वस्तू देण्यात आल्या व मोठ्या हौसेने सजविलेले रुखवत यावेळी पहायला मिळाला.
या शुभविवाह सोहळ्यासआ. महेश लांडगे, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीचे अध्यक्ष योगी निरंजननाथ गुरुशांतिनाथ,विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री.शंकरजी गायकर,पंकज महाराज गावडे,सकल हिंदू समाज प्रबोधनकार ह.भ.प. संग्रामबापू भंडारे,समाज प्रबोधनकार ह.भ.प.श्री.ज्ञानेश्वर महाराज वाबळे,मानव कल्याण आश्रमचे संस्थापक स्वामी जितेंद्रानंद सरस्वतीजी महाराज,ह.भ.प.श्री.गणेश महाराज वाघमारे,भोसरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री.महेशदादा लांडगे,श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, भाजपा नेत्या सौ.आशाताई बुचके,श्री.मंगलदास बांदल,ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अरुण भास्कर , श्देवदत्तजी निकम साहेब,जुन्नर शहराचे नगराध्यक्ष श्याम पांडे ,भाजपा तालुकाध्यक्ष संतोष खैरे , शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे जिल्हा परिषद सदस्य मोहितशेठ ढमाले, गुलाबशेठ पारखे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रकाश ताजणे,कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सौ.प्रियंकाताई शेळके,श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब कवडे,लेण्याद्री देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय ढेकणे,भाजपा मंडल अध्यक्ष अमोलजी शिंदे व महेंद्र सदाकाळ,मा.पंचायत समिती सदस्य दिलीप गांजाळे,श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष श्री.बी.व्ही.मांडे,डॉ.सदानंद राऊत,सौ.अल्काताई फुलपागार आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच सदर सोहळ्यासाठी अनेक व-हाडी मंडळी,राज्यातून ५०० अंध विद्यार्थी,अश्वमेघ परिवार,श्री.गणेशभाऊ कवडे मित्र परिवार व श्री क्षेत्र ओझर येथील सर्व संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मंडळी सोहळ्यास उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक .पांडुरंग कवडे,श्री.सुभाष दळवी व श्री.गणेश मोढवे यांनी केले.
सर्व कार्यक्रम नियोजित वेळेत पार पडले.श्री विघ्नहराच्या व श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने सर्व कार्यक्रम निविघ्न पार पडले.सर्व ज्येष्ठांची,मित्र परिवाराची,अश्वमेघ परिवाराची,ग्रामस्थांची फार मोठी साथ मिळाली म्हणूनच हा शुभविवाह अगदी उच्च प्रतिचा साजरा झाला.