नारायणगाव (प्रतिनिधी )श्री क्षेत्र ओझर येथे यंदाच्या वर्षीचा पहिला सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला. त्यामध्ये सात जोडपी विवाहबद्ध झाली. श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट, ओझर यांच्या वतीने लग्नसोहळ्याचे आयोजन केले होते. सकाळच्या सत्रात देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष,बाळकुष्ण कवडे ,उपाध्यक्ष तुषार कवडे,विश्वस्त प्रकाश मांडे,विनायक कवडे, मा.खजिनदार किसन मांडे,ग्रामस्थ रघुनाथ कवडे या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गणेशपूजन, सुपारी फोडणे, साखरपुडा टिळा कार्यक्रम पार पडले. यामध्ये वधूवरांना स्त्रीभ्रूणहत्या करणार नाही व करून देणार नाही, अशी शपथ देण्यात आली. वऱ्हाडी मंडळींसाठी सांस्कृतिक भवनच्या भोजन कक्षात रुचकर भोजनाची व्यवस्था केली होती. सुमारे चार हजार वऱ्हाडी मंडळींनी जेवणाचा आस्वाद घेतला.पिण्याचे शुद्ध पाणी, वधू वरांसाठी स्वतंत्र जानुसवाडे, वाहनतळ, स्वच्छतागृह या सारख्या सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात आले. वधुवरांच्या पक्षाकडून आकारलेल्या रकमेतून वधू वरांसाठी हार, पुष्पगुच्छ, बाशिंगे, कळसतांब्या, हळद साहित्य, मामांचे फेटे, सुवासिनींचा सत्कार, नवरदेवांचे टोप, सुपारी फोडणाऱ्या व टिळा लावणाऱ्या मान्यवरांसाठी टोपी, टावेल, अक्षदा, कन्यादान विधी इत्यादी सुविधा पुरविण्यात आल्या.
दुपारी नवरदेवांची मिरवणूक श्रींच्या मंदिराकडे दर्शनासाठी नेऊन सनईच्या मंगलस्वरात विवाहमंचाकडे आगमन झाले. याप्रसंगी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे,मा.अध्यक्ष गणेश कवडे,विश्वस्त सुर्यकांत रवळे या मान्यवरांनी वधूवरांना आशीर्वाद दिले. या प्रसंगीदेवस्थान ट्रस्टचे खजिनदार दत्तात्रय कवडे,विश्वस्त,प्रकाश मांडे,संतोष कवडे,यांची उपस्थिती होती. मंगल अष्टकांच्या सुमधूर सुरात सव्वाचार वाजता हा विवाह सोहळा संपन्न झाला. दुसरा सामुदायिक विवाह सोहळा १७ मे २०२५रोजी संपन्न होणार असल्याची माहिती देवस्थानच्या वतीने देण्यात आली. देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक पांडुरंग कवडे,अशोक घेगडे यांनी सूत्रसंचालन केले.
https://vighnahartimes.com/wp-adminSureshwani123@gmail.comgn42nDus&z0FLZd2D(K6D(8V