ओतूर: (प्रतिनिधी)
ओतूरला शिक्षणाचा खूप मोठा वसा आणि वारसा आहे. ही ऐतिहासिक शाळा आपल्या तालुक्याचे भूषण आहे. महात्मा फुले यांनी सुरू केलेली ओतूर येथील शाळा जतन व संवर्धन करण्याचा ध्यास घेतला आहे. या शाळेत शिक्षण घेतलेल्या मुली आज उच्च विद्याभुषीत असून विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत.
या शाळेच्या बांधकामासाठी अधिकचा निधी लागला तरी तो सुद्धा मिळवून देण्याची जबाबदारी माझी राहील अशी ग्वाही यावेळी आशाताई बुचके यांनी दिली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील हे शाळेस लवकरच भेट देणार आहेत. आणखी काही विस्तारित काम करायचे असेल तर करण्यात येतीलयावेळी विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक भाजप तालुकाध्यक्ष संतोषनाना खैरे, बाळासाहेब घुले, गटविकास अधिकारी विठ्ठल भोईर, भाऊ कोंडाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधाकरभाऊ डुंबरे, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष महादेव ओतूरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य तुषार थोरात, मोहित ढमाले, ओतूरच्या सरपंच छायाताई तांबे, उपसरपंच प्रशांत डुंबरे,सारथ्य फाउंडेशनचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ, शालेय शिक्षण समिती पदाधिकारी, शिक्षक वृंद, विद्यार्थीनी उपस्थित होते.
ओतूर येथील ऐतिहासिक मुलींच्या शाळेच्या नूतनीकरणासाठी आशाताई बुचके यांच्या प्रयत्नातून तब्बल 49 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले दाम्पत्याने 5 डिसेंबर 1848 रोजी ओतूर येथे मुलींसाठी चौथी शाळा सुरू केली होती. ती आजही 175 वर्षांनंतर सुस्थितीत आहे.
सारथ्य फाउंडेशन आणि सत्यशोधक भाऊ कोंडाजी डुंबरे प्रतिष्ठानच्या वतीने सदर ऐतिहासिक शाळेचे जतन व संवर्धन करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. यावेळी गटविकास अधिकारी भोईर, सुधाकर डुंबरे, संतोषनाना खैरे यांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोहित प्रमाले यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपसरपंच प्रशांत डुंबरे यांनी मानले.
