ओतूरच्या कार्यक्रमाला “विघ्नहर” ने 5 लाख 55 हजार 555 दिले.

WhatsApp


नारायणगाव : ( प्रतिनिधी) विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा कायमच धार्मिक कार्यामध्ये सहभाग असतो. त्याचाच एक भाग म्हणून जगदगुरु तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठगमन सांगता सोहळा निमित्त अखंड हरीनाम सप्ताह व संगित गाथा पारायण सोहळा जुन्नर तालुक्यातील श्री श्रेत्र ओतूर येथील चैतन्य महाराज समाधी स्थळ या ठिकाणी दिनांक- १८/५/२०२५ ते २५/५/२०२५ या कालावधीत संपन्न होत असून त्याठिकाणी विविध किर्तन सेवा व अन्नदान याचे दैनंदीन आयोजन असून त्या संदर्भात कारखाना स्थळावर वारकरी सप्रादयाचे भुषण गुरुवर्य ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कदम व इतर वारकरी भेटीस्तव आले असता सदर सप्ताहास अन्नदानासाठी मदतीचा हात म्हणून विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, सभासद, ऊस उत्पादक, अधिकारी व कर्मचारी यांचे वतीने ५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांचा धनादेश आज (दि.13) रोजी छोटी माऊली महाराज यांना सुपूर्द करण्यात आला. तसेच संपूर्ण सप्ताहा कालावधी मध्ये अॅब्युलन्स व अग्निशमन सुविधा देण्याचे कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिलदादा शेरकर यांनी जाहिर केले आहे. तसेच या कामे अजूनही काही मदत लागली तर विघ्नहर कारखाना आपल्या सोबत राहील अशी ग्वाही देखील दिली.

जाहिरात

error: Content is protected !!