ज्ञानोबा.. माऊली.. तुकाराम.. गजरात ओतूर येथे धर्मध्वजाचे अनावरण.

WhatsApp

ओतूर : (प्रतिनिधी ) ओतूर ( ता. जुन्नर ) येथे 18 मे ते 25 मे 2025 रोजी त्रिशतकोत्तर वैकुंठगमन सप्ताह सांगता सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर हजारो लोकांच्या साक्षीने ज्ञानोबा- तुकारामाच्या गजरात धर्मध्वजाचे अनावरण करण्यात आले.
श्री क्षेत्र देहू संस्थांचे अध्यक्ष ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज मोरे, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे अध्यक्ष ह.भ.प.माणिक महाराज मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे,माजी आमदार अतुलशेठ बेनके,बाळासाहेब दांगट, दिलीपराव ढमढेरे, यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य शरदराव लेंडे, पांडुरंग पवार, अंकुश आमले, तुषार थोरात, मोहित ढमाले, तसेच अनंतराव चौगुले अनिलशेठ तांबे यांसह अनेक मान्यवर संपूर्ण तालुक्यातून उपस्थित होते.
ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कदम ( छोटे माऊली ), ह.भ.प. तुळशीराम महाराज सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच ह.भ.प. गंगारामबुआ डुंबरे यांच्या नियोजनाने सदर सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे.
सदर त्रिशतकोत्तर वैकुंठगमन सप्ताह सोहळ्यासाठी भव्यदिव्य मंडपासाठी माजी आमदार अतुलशेठ बेनके यांनी 35 लाख रुपयांचा खर्च उचलला असून 10 लाख रुपये रोख दिले आहेत. तसेच समाजातील अनेक दानशूर मोठ्या उदार अंतःकरणाने सदर कार्यक्रमास मदत करत आहेत. या सोहळ्याचे आयोजन संपूर्ण जुन्नर तालुक्यासह आंबेगाव, खेड, शिरूर, पारनेर, आकोले,संगमनेर तालुक्यांसह पुणेकर आणि मुंबईकर रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
धर्मध्वज अनावरण सोहळ्यासाठी जुन्नर बाजार समितीचे संचालक तुषार थोरात, ओतूर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नितीन पन्हाळे, ओतूर सोसायटीचे व्हाईस चेअरमन प्रमोद ढमाले, सर्जेराव गाढवे, संजय खेत्री यांनी महाप्रसादासाठी विशेष सहकार्य केले. तसेच ओतूर शहर आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी घरून पुरणपोळी, कुरडई, पापडी आणि भजी आणून अक्षय अन्नदानात भरभरून सहभाग घेतला.

जाहिरात

error: Content is protected !!