पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वात मोठी समजली जाणाऱ्या नारायणगावच्या मुक्ताबाई व काळोबा देवाची यात्रेला 24 तारखेला होणार सुरुवात.
नारायणगाव : ( प्रतिनिधी ) जिल्ह्याच्या उत्तर ग्रामीण भागातील सर्वात मोठी समजली जाणारी नारायणगावच्या मुक्ताबाई देवी व काळोबा देवाची यात्रा उत्सव 24 एप्रिल ते 27 एप्रिल 2025 असा चार दिवस मुख्य यात्रा उत्सव असणार आहे,अशी माहिती मुक्ताई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व मुक्ताई समाज मंदिर ट्रस्टचे अध्यक्षअनुक्रमे बाबू पाटे व संतोष खैरे यांनी संयुक्तिक दिली. ते म्हणाले की, यात्रेच्या पहिल्या दिवशी दिनांक 24 रोजी सकाळी 9 वाजता देवीच्या मंदिरापासून उत्सव मूर्ती व पादुकांची भव्य मिरवणूक सायंकाळी 5 वाजता स्व. तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांची पुण्यतिथी व प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार आहे. व रात्री स्व.चंद्रकांत ढवळपुरीकर सोबत सिनेस्टार किरण कुमार ढवळीपुरीकर यांचा तमाशाचा कार्यक्रम होणार आहे. दिनांक 25 रोजी चोळी पातळ व घागरीचा कार्यक्रम असून सकाळी 8 ते 12 देवीचा उत्सव मांडव डहाळे व देवीचरणी नैवेद्य सायंकाळी पाच वाजता स्व. भाऊ बापू मांग नारायणगावकर व स्व.विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांची पुण्यतिथी रात्री 8 वाजता मिरवणुकीने देवीस चोळी पातळ व रात्री अकरा वाजता अंजलीराजे नाशिककर यांचा तमाशाचा कार्यक्रम होणार आहे. 26 एप्रिल हा यात्रेचा तिसरा व मुख्य दिवस म्हणून मानला जातो. या दिवशी शोभेचे दारू काम मोठ्या प्रमाणात होत असते. देवीस व काळोबा देवास मांडव डहाळे, देवीस चोळी पातळ व शेरनी नैवेद्य.सायंकाळी 5 वाजता शाहू महाराज व ज्योतिबा फुले जयंती निमित्त मिरवणूक व रात्री 8 वाजता छबिना मिरवणूक होणार असून रात्री 11 वाजता तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांच्या तमाशाचा कार्यक्रम होणार आहे. यात्रेच्या चौथ्या दिवशी 27 एप्रिल रोजी कुस्त्यांचा जंगी आखाडा भरणार आहे. या कुस्त्याच्या खाड्यामध्ये राज्यातील नामवंत मल्ल सहभागी होणार आहेत. कुस्तीच्या आखाड्याला सर्वच राजकीय पक्षाचे नेते उपस्थित राहत असतात. तसेच सायंकाळी साडेनऊ वाजता मालती इनामदार यांच्या तमाशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 28 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक व रात्री साडेनऊ वाजता राष्ट्रपती सुवर्णपदक विजेत्या विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांचे नातू मोहित नारायणगावकर यांच्या तमाशाचा कार्यक्रम होणार आहे. 29 एप्रिल रोजी शिवजयंती उत्सव साजरा केला जाणार असून रात्री साडेनऊ वाजता मंगला बनसोडे करवडीकर सोबत नितीन बनसोडे करवंडीकर यांचा तमाशा होणार आहे. 30 एप्रिल रोजी भिका भीमा सांगवीकर यांच्या तमाशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तसेच 1 मे रोजी प्रकाश अहिरेकर यांच्या तमाशाचा कार्यक्रम होणार आहे. नारायणगावची यात्रा पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते.या यात्रेला चार दिवस लाखो लोकांची उपस्थिती असते. व करोडो रुपयांची उलाढाल होत असते. भव्य विद्युत रोषणाई केली जाते. मुख्य चार दिवस भरणाऱ्या यात्रेला महाराष्ट्रभरातून लोक मोठ्या प्रमाणात येत असल्याने पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवला जातो. तसेच नारायणगाव परिसरातील नोकरी निमित्त बाहेरगावी असलेले सर्वच लोक यात्रेला गावी येत असतात.
