नारायणगाव : (प्रतिनिधी) नारायणगाव येथील लायन्स व लिओ क्लब जुन्नर शिवनेरी ,श्रीराम पतसंस्था नारायणगाव, ग्रामपंचायत नारायणगाव यांच्या वतीने येथील आठवडे बाजार आवारात नागपंचमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त विविध मल्लखांब प्रात्यक्षिके, महिलांसाठी होम मिनिस्टर,गाणी , नृत्य, उखाणे, फुगडी, पिंगा आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मल्लखांब प्रात्यक्षिकांचे उदघाटन तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष अमित बेनके यांच्या हस्ते झाले. सरपंच डॉ.शुभदा वावळ, उपसरपंच योगेश पाटे, श्रीराम पतसंस्थेचे उपाध्यक्ष शशिकांत वाजगे, संचालक अनिल डेरे,ज्ञानेश्वर रासने,अनिल थोरात, जितेंद्र गुंजाळ, दीपक वारुळे, मच्छिंद्र मुंडलिक,सह्याद्री भिसे,विश्वास भालेकर, महेश शेटे, शिरीष जठार आदी उपस्थित होते. लाकडी, दोरी मलखांब प्रात्यक्षिक स्पर्धेत जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील विविध शाळातील सुमारे दीडशे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी लाकडी व दोरी मलखांबावरील विविध प्रकारची प्रात्यक्षिके, मनोरे सादर करून उपस्थिताची मने जिंकली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षिसे देऊन सहभागी मलखांब खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. पिंपळवंडी येथील सनी क्रिडा मंडळ , वडज येथील कुलस्वामी माध्यमिक विद्यालय, कोल्हे मळा येथील श्री संत सावता माळी मंडळ, घोडेगाव येथील जनता विद्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,जेटीएम स्कूल मधील विद्यार्थ्यांनी लाकडी व दोरी मल्लखांब वरील सादर केली. कसरती पाहून प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून, रोख बक्षीस देऊन दाद दिली. विद्यार्थ्यांनी साधी, बगली, झाप , हनुमान पकड,मयुरासन,शवासन,तराजू, दसरंग , नागमोडी वेल , खांदा उडी, ताजवा, बजरंग उडी,चढता वेल, पद्मासन , पर्वतासन आदि लाकडी व दोरी मल्लखांबावरील लक्षवेधी प्रात्यक्षिके सादर केली.या स्पर्धेचे सूत्रसंचालन व नियोजन माजी मुख्याध्यापक एच.पी. नरसुडे, अजित वाजगे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक भालचंद्र करांडे, एस.एस.आरोटे, आशिषकुमार कोल्हे, सतीश निमसे, नवनाथ निर्मळ यांनी केले. महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या अंतर्गत महिलांसाठी घेण्यात आलेल्या उखाणा ,नृत्य, गाणी, फुगडी, पिंगा आदि स्पर्धेत महिलांनी भाग घेतला. श्रीराम पतसंस्थेच्या संचालिका राजश्री बेनके,नंदा मुथा,उज्ज्वला मुंडलिक,मीरा भिसे,गौरी शेटे,किशोरी वारुळे,अंजली गुंजाळ,नूतन चोरडिया,किर्ती मुळे, शितल जठार,अंजली जंगम, संगीता वाजगे,वैशाली भालेकर,नंदा शिंदे,पल्लवी राऊत यांच्या हस्ते विजेत्या महिलांना पैठणी व बक्षिसे देण्यात आली. @लकी ड्रॉ च्या विजेता महिला:प्रथम बक्षीस फ्रीज : शारदा विधाटे,द्वितीय बक्षीस आटा चक्की : सृष्टी विश्वासराव.श्रीराम नागरी पतसंस्था यांच्या वतीने मयुरी औटी,आशा सैद,ज्योती सरोदे,हर्षाली कोऱ्हाळे मंगल गडगे या महिलांना मानाची पैठणी भेट देण्यात आली. होम मिनिस्टर कार्यक्रमाचे संयोजन बाळकृष्ण नेहेरकर यांनी केले.