नारायणगाव : (प्रतिनिधी) पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव पिंपळवंडी दरम्यान रस्त्याला खूप खड्डे पडले वारंवार मागणी करून देखील संबंधित अधिकारी याकडे लक्ष देत नसल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून येथे आठ दिवसात रस्त्याचे खड्डे बुजवले नाही तर संबंधित अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा युवक संघटनेचे अध्यक्ष सचिन थोरवे यांनी दिला आहे. या महामार्गावर नारायणगाव ते पिंपळवंडी बस स्थानक दरम्यान रस्त्याला खूप खड्डे पडलेले आहेत. अनेकदा संबंधित अधिकाऱ्यांना सांगून देखील त्याची दखल घेतली जात नाही. या रस्त्यावरून दररोज हजारो वाहने ये जा करीत असतात. रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डे असल्यामुळे या खड्ड्यात वाहन आढळून वाहनांचे तर नुकसान होतेच शिवाय दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या वाहन स्वरांचे मणके देखील खिळखिळे झाले आहेत. पावसाळा उघडून तीन महिने झाले तरी देखील या रस्त्याचे खड्डे बुजवले जात नसल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. टॅक्स भरूनही जर आम्हाला खड्ड्यातून प्रवास करावा लागत असेल आणि चाळकवाडी येथील टोल नाक्यावर टोल भरावा लागत असेल तर हे आमचे दुर्दैव असल्याचे थोरवे आणि सांगितले. अगोदर रस्त्याचे खड्डे बुजवा व तोपर्यंत चाळकवाडीचा टोल नाका बंद ठेवा अशी मागणी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे. दरम्यान यासंदर्भामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे संबंधित अधिकारी दिलीप शिंदे यांच्याशी भ्रमणधुरून संपर्क साधला असता ते म्हणाले की, आळेफाटाच्या दिशेने या रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले आहे. इथे काही दिवसात हे संपूर्ण खड्डे बुजवले जातील असे त्यांनी सांगितले.