नारायणगाव : (प्रतिनिधी ) नारायणगाव शहरांमधील मतदार यादीत दुबार नावे व बोगस मतदार हे जवळपास अडीच हजार आहे या बोगस मतदानामुळे निवडणूक लढवल्या जातात जिंकल्या जातात हे खऱ्या अर्थाने लोकशाहीची हत्या आहे लोकशाहीचा अपमान आहे स्वतः प्रशासनाने त्या ठिकाणी जाऊन स्थळ पाहणी करावी व बोगस मतदार यादीतून वगळावेत मतदार यादी स्वच्छ केली जावी रमेश मेहेत्रे यांनी केली आहे..या आगोदर मतदार याद्या चेक केल्या तेव्हा निदर्शनास आले की ज्या ठिकाणी मतदार राहतच नाही पण मतदार यादी मध्ये त्यांची नावे आहेत या बोगस मतदारांच्या आधारे निवडणुका या लढवल्या जातात आणि जिंकल्या जातात. एवढेच नाही तर नारायणगाव शहरांमध्ये बांगलादेशी घुसखोर राहतात त्यांचे आधार कार्ड त्यांचे मतदार यादी मध्ये नाव आणि मतदान करतात देखील.दहशतवादी विरोधी पथकानेदेखील कारवाई केली ही खरंतर नारायणगावकरांसाठी दुर्दैवी पाप म्हणावे लागेल या गोष्टीचं निंदा करावी थोडी आहे.
प्रशासनाने येत्या सहा नोव्हेंबर पर्यंत होम टू हम सर्वे करून बोगस नावे वगळावे प्रशासनाने जर कारवाई केली नाही तर 7 नोव्हेंबरला नारायणगाव तलाठी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले जाईल असा इशारा रमेश मेहेत्रे यांनी माध्यमाशी बोलताना दिला आहे.