नारायणगाव : (प्रतिनिधी) इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन आळेफाटा शाखा आणि जुन्नर- आंबेगाव -खेड तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक फार्मासिस्ट दिन दिनांक, २५ सप्टेंबर रोजी नारायणगाव येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
या दिनानिमित्त जयहिंद कॉलेज ऑफ फार्मसी, वडगाव सहानीसह परिसरातील विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी नारायणगाव शहरात भव्य रॅली काढून ‘थिंक हेल्थ, थिंक फार्मासिस्ट’ या संकल्पनेवर आधारित पथनाट्य सादर केले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. एम. एल. श्रॉफ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांना फार्मासिस्ट दिनानिमित्त प्रतिज्ञा देण्यात आली. या वेळी जयहिंद कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे नारायणगाव व वारूळवाडी परिसरातील कार्यरत फार्मासिस्टचा विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जुन्नर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष सुरेश वऱ्हाडी व अजय चोरडिया, केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे चे मेंबर महेश शिंदे यांच्या उपस्थितीत रॅलीची सुरुवात झाली.
या कार्यक्रमास जयहिंद शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, विशाल सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे, जुन्नर- आंबेगाव -खेड तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष चोरडिया, नारायणगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच बाबुभाऊ पाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन आळेफाटा शाखेचे अध्यक्ष डॉ. डी. डी. गायकवाड यांच्यासह इतर महाविद्यालयांचे प्राचार्य व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या रॅलीत जयहिंद कॉलेज ऑफ फार्मसी, वडगाव सहानी, विशाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, आळे, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, बेल्हे, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बेल्हे, शिवनेरी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, खानापूर, मातोश्री राधा कॉलेज ऑफ फार्मसी, अकोले, श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, माळवाडी, अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसी, संगमनेर, विशाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, आळे, सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी, शिरूर आदी महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन जयहिंद कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. तेजस पाचपुते यांनी केले.