नारायणगाव पोलिसांची मोठी कारवाई.घातक शस्त्रासह साडे पाच लाख रुपये किमतीचा मुद्येमाल जप्त : दोन जणांना अटक.

WhatsApp


नारायणगाव : ( प्रतिनिधी) येडगाव (ता. जुन्नर )येथे कारवाई करून नारायणगाव पोलिसांनी एक पिस्तुल,दोन जिवंत काडतुसे, एअरगन, दोन कोयते व मोटारसायकल च्या चैनस्पाॅकेटच्या व लोखंडी सळईच्या सहायाने बनवलेले हत्यार, स्वीफ्ट मोटार असा एकुण 5 लाख 27 हजार 100 रुपये किमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला
असून याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना जुन्नर न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.
या प्रकरणी सार्थक जयसिंग नेहरकर, राजु अजितसिंग रजपुत( दोघेही रा.येडगाव ता.जुन्नर) यांना पोलिसांनी अटक केली आहे. घातक शस्त्र व हत्यारे कोणत्या
कारणासाठी जवळ बाळगली होती. याबाबतचा तपास तपास पोलीस करत आहेत
सार्थक नेहरकर याच्याकडे गावठी पिस्टल असल्याची गोपनीय माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार यांना मिळाली होती. त्या दृष्टीने नारायणगाव पोलीस ठाण्याचे व गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस पथक संशयित आरोपीचा शोध घेत होते.
या पथकाने आरोपी सार्थक नेहरकर याला 8 ऑगस्ट रोजी येडगाव येथून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता राजु रजपुत याच्या मोटारीत( एम एच 14 डी ए 4766) शस्त्र व हत्यारे ठेवली आहेत.अशी माहिती मिळाली. पोलिसांनी रजपूत सह त्याची मोटर ताब्यात घेऊन तपासणी केली असता एक पिस्तुल,दोन जिवंत काडतुसे, एअरगन, दोन कोयते व मोटारसायकलच्या चैनस्पाॅकेटच्या व लोखंडी सळईच्या सहायाने बनवलेले हत्यार मोटारीत आढळून आले.पोलीस अधिक्षक संदीप सिंह गिल्ल,अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक शेलार, पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील, पोलीस हवलदार मंगेश लोखंडे, पोलीस शिपाई गोविंद केंद्रे, सत्यम केळकर, सोमनाथ डोके, महिला पोलीस शिपाई सोनाली रघतवान, कविता गेंगजे, पोलीस शिपाई टिलेश जाधव, स्थानीक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार दिपक साबळे, पोलीस हवालदार संदीप वारे, पोलीस शिपाई अक्षय नवले यांनी ही कारवाई केली आहे.

जाहिरात

error: Content is protected !!