संविधानाने देशाला लोकशाही दिली- प्राध्यापक प्रकाश पवार

WhatsApp


नारायणगाव : (प्रतिनिधी) “संविधानाने देशाला लोकशाही दिली. ती अजून पुरेशी प्रगल्भ नाही परंतु येणाऱ्या काळात ती अजून प्रगल्भ होईल, हा विश्वास आहे.संविधान लागू झाल्यानंतर पहिली २०-२५ वर्षे चांगली होती कारण लाभधारक स्वातंत्र्य चळवळीतील लोक होते. नंतर त्याबद्दलची जाणीव कमी होत गेली.संविधानाबद्दल जेव्हा १०० टक्के जनता साक्षर होईल तेव्हा या देशात सामाजिक क्रांती होईल, असे प्रतिपादन संविधान अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश पवार यांनी केले. नारायणगाव (ता.जुन्नर) येथे रविवारी (दि.२७) भारतीय संविधान जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली.जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ, सामाजिक समता प्रतिष्ठान, श्यामची आई सेवा समिती, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी डॉ.पवार म्हणाले की, “छत्रपती शिवाजी, छत्रपती शाहू आणि सम्राट अशोक फक्त हेच समतेचा पुरस्कार करणारे राजे झाले.२६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या दोन दिवसांत नक्की फरक काय याबद्दल नागरिकांमध्ये संभ्रम दिसतो. संविधानाच्या माध्यमातून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील विविध जाती, धर्म, विविध संस्कृती, परंपरा, विविध भाषिक नागरिकांना एकसंध ठेवले आहे.भारतीय संविधान हे जगातली सर्वश्रेष्ठ आणि मोठे संविधान आहे. या कार्यक्रमात नारायणगाव, मांजरवाडी, धनगरवाडी या ग्रामपंचायतींना, हिवरे येथील कुलस्वामी खंडेराय विद्यालय, नारायणगाव येथील तात्यासाहेब भुजबळ कृषी शिक्षण संकुल, अनअकॅडमी सेंटर, खोडद येथील श्री अंबिका ग्रामीण पतसंस्था, क्रांती सूर्य प्रतिष्ठान कैलासनगर, नारायणगाव शहर पत्रकार संघ या संस्थांना प्रातिनिधिक स्वरूपात संविधान उद्देशिका प्रतिमा भेट देण्यात आली.भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पुढील वर्षभरात तालुक्यातील ७५ शाळांना व विविध संस्थांना संविधान उद्देशिका प्रतिमा भेट देऊन संविधान जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. यावेळी सरपंच डॉ.शुभदा वाव्हळ, उपसरपंच योगेश पाटे, जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका प्रियंका शेळके, यांची भाषणे झाली.या प्रसंगी नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, अरुणा वाघोले, अनअकॅडमीचे संचालक राजेंद्रकुमार देसाई, ज्येष्ठ पत्रकार संदीप बनसोडे, प्रा.सुधीर रोकडे, प्रवीण ताजने, विजय लोखंडे, तानाजी वामन, अभय वाव्हळ, महेश शेळके, रवींद्र तोरणे, पांडे, काकडे डॉ.मिलिंद कसबे, अंबिका संस्थेचे अध्यक्ष रोहिदास गायकवाड, उपाध्यक्ष सुरेश खरमाळे व सर्व संचालक, मांजरवाडीच्या सरपंच सारिका गायकवाड, उपसरपंच संतोष मोरे, अरुण मोरे, उदय खंडागळे, संजय रणदिवे, प्रशांत शेटे, डॉ .सदानंद राऊत, डॉ. वाघोले, उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी दिलेल्या योगदानाबद्दल शल्यचिकित्सक डॉ.हनुमंत भोसले, डॉ.प्रवीण शिंदे, डॉ.सदानंद राऊत, राजेंद्रकुमार देसाई, श्रीकांत मोरे यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.पाहुण्यांचे स्वागत सामाजिक समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास डुंबरे यांनी केले.प्रास्ताविक अशोक खरात यांनी केले.सूत्रसंचालन रतीलाल बाबेल यांनी केले.राजकुमार डोंगरे यांनी आभार व्यक्त केले.

एकदा निवडून गेल्यावर अनेक लोकप्रतिनिधींना पाच वर्ष जनतेचा विसर पडतो आणि जनता देखील जागरूक नागरिक म्हणून त्यांच्यावर आवश्यक तेवढे नियंत्रण ठेवत नाही.आज विधिमंडळातील चर्चांमधून आणि सरकारच्या धोरणांतून स्पष्ट दिसून येते की सत्तेत असलेले अनेक लोक संविधानाच्या विरोधात भूमिका घेत आहेत, हे अत्यंत धोकादायक आहे.” – डॉ.प्रकाश पवार, संविधान अभ्यासक व उपप्राचार्य फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे

जाहिरात

error: Content is protected !!