नारायणगाव : ( प्रतिनिधी) नारायणगाव (तालुका जुन्नर) येथील इनरव्हील क्लबला सिम्बॉयसिस भवन विमाननगर पुणे येथे नुकत्याच झालेल्या आय डब्लू सी च्या डिस्ट्रिक्ट असेंब्ली मीट कार्यक्रमात विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यावेळी अनेक गावांच्या क्लबच्या महिलांचा उत्स्फुर्त सहभाग होता. इनरव्हील क्लब मार्फत चांगले काम करणार्या क्लबचा आणि पदावरील महिलांचा येथे सन्मान करण्यात आला. नारायणगाव क्लबला हॅपी स्कूल, मेडिकल, कॅन्सरवर आधारित उपाययोजना एन्व्हायरमेंट, महिला सबलीकरण ,जेष्ठ नागरिकांसाठी राबवलेले कार्यक्रम या सर्व प्रोजेक्टसाठी पुरस्कार देण्यात आला. इनरव्हील ग्रुपच्या गतवर्षीच्या अध्यक्षा सविता खैरे आणि सेक्रेटरी प्रीती शहा यांना बेस्ट प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी जोडीच्या मानकरी म्हणून गौरवण्यात आले. यावेळी संस्थापक अंजली खैरे, अध्यक्ष समृद्धी वाजगे, सचिव सुजाता भुजबळ, नंदा मुथ्था, रूचिता वाघ, वर्षा तांबे उपस्थित होत्या.