नारायणगाव : ( प्रतिनिधी ) ओम श्री साईराम शिक्षक प्रतिष्ठान नारायणगाव तर्फे शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान सोहळा नारायणगावात साजरा करण्यात आला.
शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी नेहमीच ओम श्री साईराम शिक्षक प्रतिष्ठान असे विविध उपक्रम राबवित असते.
ओम श्री साईराम शिक्षक प्रतिष्ठान सदस्य संगिता सतीश वाव्हळ,आशा सुनील पाटील,कविता गणेश डुंबरे,सुमन सयाजीराव चिखले या शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,शाल व गुलाबपुष्प देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रसंगी जुन्नर तालुक्यातील युवा सामाजिक नेतृत्व सुरजभाऊ वाजगे,महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे राज्य संपर्कप्रमुख मंगेश मेहेर,साने गुरुजी कथामाला पुणे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब कानडे,जुन्नर तालुका शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रमाकांत कवडे,माजी अध्यक्ष रवींद्र वाजगे,शिक्षक नेते विश्वनाथ नलावडे,आंबेगाव तालुका शिक्षक संघटनेच्या माजी अध्यक्षा मनिषा कानडे,अर्थसंपदा पतसंस्थेचे विद्यमान संचालक शरदराव शिंदे,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श मुख्याध्यापक शैलेंद्र चिखले,केंद्र प्रमुख दिनेश मेहेर,अविनाश शिंगोटे,रंगनाथ पवार,जुन्नर तालुका शिक्षक पतसंस्थेचे मानद सचिव अंबादास वामन,संचालक सचिन मुळे,ओम श्री साईराम शिक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश गडगे,उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे,खजिनदार विजय नागरे,सचिव साईनाथ कनिंगध्वज,रियाज मोमीन,सुनिल हाडवळे,मनोहर वायकर,सुनिल पाटील,बाळासाहेब गिलबिले,चांगदेव पडवळ,विकास कानडे,संतोष थोरात,संतोष कानडे,बबनराव सानप,बाळासाहेब राजगुरू,गणेश डुंबरे,ज्ञानेश्वर शिर्के,मुख्याध्यापिका मंदाकिनी शिंदे,ऊर्मिला वाजगे,रोहिणी गिलबिले आदी मान्यवर व प्रतिष्ठानचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन प्रतिष्ठानचे सदस्य सतिश वाव्हळ,गणेश कवडे,दत्ता हांडे,प्रदिप डोंगरे,रुपेश पवार,सचिन खिलारी यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश गडगे यांनी केले.सूत्रसंचालन सचिव साईनाथ कनिंगध्वज यांनी तर आभार खजिनदार विजय नागरे यांनी मानले.