नारायणगावला सिनेस्टाईल चोरी.

WhatsApp


नारायणगाव : (प्रतिनिधी) नारायणगाव येथील बँक ऑफ बडोदा येथे पैसे डिपॉझिट करून घरी निघालेल्या अजित अशोकराव कोल्हे या चार चाकी चालकाला तुमच्या गाडीची हवा कमी आहे असे सांगून गाडीतील बॅग घेऊन दुचाकी वर पळून जणाऱ्या दोघांनी सिनेस्टाईल चोरी केल्याचा प्रकार नारायणगाव येथे आज ( दि. 15)दुपारी साडेचार ते पाच वाजण्याच्या दरम्यान घडला. पाकिटात असलेले पाच हजार रुपये होते ते चोरट्याने लंपास केले. अजित कोल्हे व त्यांची आई शशिकला कोल्हे या टायरची हवा चेक करण्यासाठी येथील गोविंद प्लाझा इमारतीसमोर कोराळे सर्विस स्टेशन येथे आले असता तेथे दुचाकी वर दोघेजण अज्ञात चोरटे येऊन त्यांनी कोल्हे यांच्या मागच्या सीटवर असलेली कार्यालयीन कामकाजाची बॅग पळवून नेली. या बॅगेत त्यांनी बँकेची कागदपत्र व पैशाचे पाकीट ठेवले होते. ही घटना आशिष वसंत खैरे उर्फ टम्या यांनी पाहिल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला त्यानंतर लगेचच या चोरट्यांचा पाठलाग अभिजीत कोराळे व त्यांच्या मित्राने केला असता चोरटे पसार होण्यास सफल झाले. घटनास्थळी नारायणगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज वरून या चोरीचा तपास करण्यात येईल असे पोलीसांनी सांगितले.

जाहिरात

error: Content is protected !!