नारायणगाव मधून मोटरसायकल चोरी करणाऱ्या इसमाला 24 तासांचे आत नारायणगाव पोलीसांकडून अटक, पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत.

WhatsApp

नारायणगाव : (प्रतिनिधी )नारायणगाव मधून मोटरसायकल चोरी करणाऱ्या इसमाला 24 तासांचे आत नारायणगाव पोलीसांकडून अटक, पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत. नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा नारायणगाव हद्दीतील वाजगे आळी येथील मनोज वसंतलाल दर्डा यांचे घरासमोर पार्क केलेली मोटरसायकल चोरी गेल्याची तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून शोध घेऊन 24 तासाचे आत चोरट्याचा छडा लावून मोटरसायकल हस्तगत करण्यात यश मिळविले. गुंजाळवाडी ( ता. जुन्नर) निखिल नवनाथ मुळे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन मोटरसायकल हस्तगत केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली. 18 जून रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दुचाकी वाहन चोरी गेले होते.या गुन्ह्याची माहिती मिळताच नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील, पोलीस उपनिरीक्षक जगदेवअप्पा पाटील, पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे, पोलीस हवालदार मंगेश लोखंडे पोलीस शिपाई सुभाष थोरात, टीलेश जाधव, सत्यम केळकर सोमनाथ डोके, अनिल थोरात, काळूराम मासाळकर, गोविंद केंद्रे यांची टीम तयार करून नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत सीसीटीव्ही फुटेज चेक करून तसेच पेट्रोलिंग करत असताना संशयित इसम नामे निखिल नवनाथ मुळे,( वय 29 वर्ष, राहणार गुंजाळवाडी तालुका जुन्नर, जिल्हा पुणे ) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याचे कडून रुपये 50 हजार रुपये किमतीची ग्रे कलरची स्कुटी मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार दत्ता तळपाडे करीत आहे. @ फोटो खालील ओळ – नारायणगावच्या वाजगे आळी येथील दुचाकी वाहन चोरणाऱ्या इसमास पोलिसांनी केली अटक. सोबत पोलीस पथक. ( छाया सुरेश वाणी )

जाहिरात

error: Content is protected !!