नारायणगाव : (प्रतिनिधी) ग्रामोन्नती मंडळाचे आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज नारायणगाव, पुणे आणि गोवा राज्यातील गोवा विद्यापीठाशी संलग्न कुंकोलीम एजुकेशन सोसायटीचे आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, सॅलसीटे, मडगाव, गोवा या दोन महाविद्यालयात नुकताच शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद कुलकर्णी आणि वाणिज्य व व्यवस्थापन संशोधन केंद्राचे प्रमुख प्रा.डॉ.जे.पी.भोसले यांनी दिली. प्रस्तूत राष्ट्रीय शैक्षणिक करारांतर्गत दोन्ही महाविद्यालयातील प्राध्यापकांची शैक्षणिक योगदानासाठी देवाण-घेवाण करणे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे व कार्यशाळा आयोजित करणे, एकत्रित संशोधन करणे, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी देवाण-घेवाण करणे, सांस्कृतिक उपक्रमांसाठी विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची देवाण-घेवाण करणे, विद्यार्थ्यांना इंटर्नशिप प्रशिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करुन देणे, महाविद्यालय व संस्था पातळीवर एकूण गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे इत्यादी उपक्रमांचा समावेश आहे. दोन्ही महाविद्यालयाच्या ‘टोटल क्वालिटी मॅनेजमेंटसाठी’ सदर सामंजस्य कराराची मदत होणार आहे. तसेच नारायणगाव महाविद्यालयाचा बँकॉक-थायलंड येथील राजपार्क इन्स्टिटयूट आंतरराष्ट्रीय विद्यापीठाशी शैक्षणिक करार केलेला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक सामंजस्य करार करण्याकामी वाणिज्य व व्यवस्थापन संशोधन केंद्राचे प्रमुख प्रा.डॉ.जे.पी.भोसले, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.आकाश कांबळे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डॉ.एस.डी.टाकळकर, डॉ.अनुराधा घुमटकर, डॉ.विनोद पाटे, डॉ.आबा जगदाळे, डॉ.सारिका जगदाळे, प्रा.शंतनू ठाकरे, प्रा.निलेश गावडे, प्रा.सदगुरु जाधव यांचे विशेष सहकार्य मिळाले. प्रस्तूत शैक्षणिक सामंजस्य करार करण्यासाठी ग्रामोन्नती मंडळाचे विश्वस्त-मा.प्रकाश पाटे, विश्वस्त-मा.सौ.मोनिकाताई मेहेर, अध्यक्ष-मा.सुजितभाऊ खैरे, कार्याध्यक्ष-मा.अनिल मेहेर, उपाध्यक्ष-मा.शशिकांत वाजगे, उपकार्याध्यक्ष-मा.डॉ.आनंद कुलकर्णी, कार्यवाह-रविंद्र पारगावकर, सहकार्यवाह-मा.अरविंद मेहेर आणि प्राचार्य डॉ.ए.बी.कुलकर्णी यांचे बहूमोल मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.