नारायणगाव (प्रतिनिधी )ता. 23: येथील खोडद रस्त्यालगत असलेल्या साई सिद्धी अपार्टमेंटमधील मधील
बंद फ्लॅटला आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीत फ्लॅट मधील फर्निचर कपडे कौटुंबिक साहित्य जळून भस्मसात झाले.
नारायणगाव ग्रामपंचायत, राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी आग विझवण्यास मदत केली. वेळीच आग विजवल्याने परिसरातील दुकाने व फ्लॅटचे संभाव्य नुकसान टळले.
शॉर्टसर्किटमुळे आग लागली असा अंदाज व्यक्त होत आहे.नारायणगाव परिसरातील मागील महिना भरातील आगीची ही दुसरी घटना आहे.
येथील साई- सिद्धी सोसायटी मधील दुसऱ्या मजल्यावर बाळासाहेब कानडे यांना भाड्याने रहात आहेत. कानडे हे बाहेरगावी असल्याने सदनीका बंद होती.
आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास या सदनिकेला आग लागली. या मुळे साई सिद्धी सोसायटी मधील
नागरिक भयभीत झाले. नारायणगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच योगेश पाटे यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव ग्रामपंचायतचे कर्मचारी, राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांनी ग्रामपंचायतच्या अग्निशामक यंत्रणेच्या सहाय्याने आग विझवण्यात यश मिळवले.
