नारायणगाव :(प्रतिनिधी )नारायणगाव , बोरी साळवाडी, मांजरवाडी परिसरातून शेतकऱ्यांच्या नदीतून पाण्याच्या मोटरच्या केबल चोरी करणाऱ्या सात आरोपींना नारायणगाव पोलीसांनी ठोकल्या बेड्या … केबलचे बंडल, एक महिंद्रा पिकअप व दोन मोटरसायकल सह 6 लाख 70 हजार 400/- रुपयांचा मद्देमाल हस्तगत करत चार गुन्हे उघडकीस आणण्यात नारायणगाव पोलीसांना यश आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.
मागील काही दिवसापासून नारायणगाव, बोरी साळवाडी , मांजरवाडी तसेच आजूबाजूच्या परिसरात पाण्याच्या मोटारच्या केबल चोरीच्या घटना वाढल्या होत्या त्या अनुषंगाने पुणे ग्रामीण जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख यांनी या गुन्ह्यांना प्रतिबंध करून गुन्ह्यांची तात्काळ उकल करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत गणपत बबन बांगर (वय 66 वर्षे, व्यवसाय शेती, रा. बोरी खु, साळवाडी ता. जुन्नर जि. पुणे) यांच्या तसेच इतर 20 ते 25 शेतकऱ्यांच्या नदीतील पाण्याच्या मोटरच्या केबल चोरीच्या गेल्याच्या घटना घडल्या होत्या सदर चोरीच्या घटनेच्या अनुषंगाने नारायणगाव पोलीस स्टेशन येथे पुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने नारायणगाव पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री महादेव शेलार यांनी पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे, पोलीस उपनिरीक्षक जगदेव पाटील, पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील, पोलीस हवालदार पोपट मोहरे, पोलीस हवालदार दत्ता तळपाडे ,पोलीस हवालदार आदिनाथ लोखंडे, महिला पोलीस हवालदार तनुश्री घोडे, पोलीस शिपाई सत्यम केळकर, पोलीस शिपाई गोरक्ष हासे, पोलीस शिपाई सुभाष थोरात, पोलीस शिपाई सोमनाथ डोके, पोलीस शिपाई बनकर, पोलीस शिपाई टीलेश जाधव, ट्रॅफिक वॉर्डन सोनवणे यांची टीम तयार करून गोपनीय माहितीच्या आधारे संशयित इसम नामे १) अमोल रामदास मेंगळे (वय 20 वर्षे राहणार वराळे तालुका खेड जिल्हा पुणे) 2) बाळू रामनाथ हिंदोळे( वय 28 वर्ष राहणार अंबड मुक्ताईवाडी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर) 3) आकाश प्रकाश जाधव (वय 20 वर्षे राहणार महाळुंगे पडवळ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे)
4) शरद रमेश गांडाळ (वय 24 वर्षे राहणार सावरचोळ तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर)
5) अविनाश मंगेश काळे,( वय 23 वर्ष 6) मनोहर रामचंद्र गावडे वय 42 वर्ष )7) शैलेश बाळू पारधी वय 25 वर्ष
(तिघे राहणार महाळुंगे पडवळ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे )यांना दिनांक 15/04/2025 रोजी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरी केलेल्या केबलचे बंडल, एक महिंद्रा पिकअप व दोन मोटरसायकल सह एकूण 6 लाख 70 हजार 400/- रुपयांचा मद्देमाल हस्तगत करत चार गुन्हे उघडकीस आणण्यात नारायणगाव पोलिसांना यश आले आहे.
आरोपींना प्रथम वर्ग न्यायालय जुन्नर येथे हजर केले असता त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार पोपट मोहरे हे करीत आहेत. ही कामगिरी पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे , उपविभागीय पोलीस अधिकारी , रविंद्र चौधरी , स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री महादेव शेलार, पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे, पोलीस उपनिरीक्षक जगदेव पाटील, पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील, पोलीस हवालदार पोपट मोहरे, पोलीस हवालदार दत्ता तळपाडे , पोलीस हवालदार आदिनाथ लोखंडे, पोलीस हवालदार संतोष कोकणे, महिला पोलीस हवालदार तनुश्री घोडे, सोनाली गडगे, पोलीस शिपाई सत्यम केळकर, पोलीस शिपाई गोरक्ष हासे, पोलीस शिपाई सुभाष थोरात, पोलीस शिपाई सोमनाथ डोके, पोलीस शिपाई बनकर, पोलीस शिपाई टीलेश जाधव , ट्रॅफिक वॉर्डन सोनवणे, महिला पोलीस शिपाई सोनाली रगतवान, शुभांगी दरवडे, पूनम गारगोटे, पूजा शहा, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दिनेश साबळे, पोलीस नाईक संदीप वारे, पोलीस शिपाई अक्षय नवले यांचे पथकाने केले आहे. दरम्यान पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास लवकर लागल्याबद्दल शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.
