लाला बँकेला “ वसंतदादा पाटील उत्कृष्ठ नागरी सहकारी बँक ” पुरस्कार जाहीर.

WhatsApp

नारायणगाव : ( प्रतिनिधी ) नारायणगाव येथील लाला अर्बन या बँकेने सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षामध्ये उल्लेखनीय कामकाज केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनने आयोजित केलेल्या उत्कृष्ट नागरी सहकारी बँकेच्या स्पर्धेमध्ये पुणे विभागामधून ५०० कोटीपर्यंतच्या ठेवी असलेल्या बँकामधुन सन २०२३-२०२४ सालासाठी “ पद्मभूषण वसंतदादा पाटील उत्कृष्ठ नागरी सहकारी बँक “ पुरस्कारासाठी लाला बँकेची निवड करण्यात आली असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष युवराज बाणखेले यांनी दिली याबाबतचे लेखी पत्र महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन यांचे आले असल्याचे त्यांनी सांगितले. लाला बँकेने सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात ठेवींमध्ये ४५ कोटींची वाढ केली असून कर्जामध्ये ४६ कोटींची वाढ झालेली आहे. तसेच बँकेचा सी.आर.ए.आर १४.०६ % असुन नेट एनपीए चे प्रमाण 0 टक्के राखले आहे. आणि ऑडिट वर्ग ‘ अ ‘ मिळाला आहे. या प्रमुख आर्थिक गुणवत्तेच्या निकषावर हा पुरस्कार लाला बँकेस जाहीर झाला आहे. याच आर्थिक वर्षामध्ये बँकेची १४ वी शाखा ओतुर येथे एटीएम सह कार्यान्वित झालेली असुन पुढील काळात शेल पिंपळगाव येथे सुरू करण्याचा मानस संचालक मंडळाचा असल्याचे अध्यक्ष बाणखेले यांनी सांगितले . बँकेचे सभासद, ग्राहक, ठेवीदार ,कर्जदार यांनी बँकेवर दाखविलेला विश्वास आणि बँकेचे कर्मचारी, मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी बँक व्यावसायवाढीसाठी प्रामाणिकपणे व तळमळीने केलेले काम यामधून हे यश संपादन झाले आहे. याची दखल महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन यांनी घेवून लाला बँकेस पुरस्कार जाहीर केला. त्याबद्दल असोसिएशनचे पदाधिकारी यांचे युवराज बाणखेले यांनी आभार मानले आहेत. बँकेचे मोबाईल बँकिंग सेवा १ जानेवारी २०२५ पासून कार्यान्वित झालेली असुन यास खातेदारांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. सर्वच ग्राहकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष युवराज बाणखेले यांनी आवाहन केले. @ सोबत अध्यक्ष युवराज बानखेले यांचा फोटो

जाहिरात

error: Content is protected !!