पुणे जिल्ह्यात गुरुवार पासून विकसित कृषि संकल्प अभियान राबवले जाणार.जिल्ह्यातून १८० गावातील शेतकरी होणार सहभागी.

WhatsApp

नारायणगाव: ( प्रतिनिधी )केंद्रीय कृषि आणि किसान कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या संकल्पनेतून भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशभरात दिनांक २९ मे ते १२ जुन २०२५ दरम्यान ‘विकसित कृषि संकल्प अभियान’ राबविले जाणार आहे. ‘अनुसंधान किसान के द्वार’ या संकल्पनेवर आधारित या महत्वाकांक्षी अभियानात खरीप हंगामातील नियोजन, पिकांचे सुधारीत लागवड तंत्रज्ञान, अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, कृषिच्या विविध योजना आदींबाबत शेतकऱ्यांना बांधावर जाऊन शास्त्रज्ञ, अधिकारी, प्रयोगशील शेतकरी मार्गदर्शन करण्यात आहे अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ प्रशांत शेटे यांनी दिली.
सदरील अभियानात कृषि संबंधित विविध विभागांच्या यंत्रणांच्या सहभागाने आणि समन्वित प्रयत्नांनी आयोजिले जाणार आहे. देशभर चालणाऱ्या या अभियानात पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील निवडक १८० गावात विकसित कृषी संकल्प अभियानाचा रथ पोहचर आहे.

दि.२९ मे ते १२ जुन दरम्यान असणाऱ्या या अभियानासाठी शास्त्रज्ञांच्या दोन टीम तयार करण्यात आल्या आहेत. या प्रत्येक टीममध्ये भारतीय कृषि अनुसंधान परिषद द्राक्ष संशोधन केंद्र, पुष्प संशोधन केंद्र, कांदा व लसूण संशोधन केंद्र, पुणे, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, कृषि विज्ञान केंद्र, नारायणगाव येथील शास्त्रज्ञ तसेच आत्मा, कृषी विभाग यांचा सर्व अधिकारी वर्ग सहभागी होणार आहे. या अभियाना दरम्यान तत्सम गावांमधील प्रगतिशील व उद्यमशील, प्रयोगशील शेतकरी प्रामुख्याने निमंत्रित केले आहे. या अभियानात पाच गावांच्या समुहातील एका गावात हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात शेतकरी, शेतकरी गट, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांचा सहभाग होणार आहेत. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, गरजा तसेच नावीन्यपूर्ण संशोधन संदर्भात शास्त्रज्ञ शेतकऱ्यांशी थेट संवाद साधतील. यावेळी छोटेखानी प्रदर्शनी लावण्यात येईल. या विकसित कृषि संकल्प अभियानात शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन कृषिरत्न अनिल तात्या मेहेर, केंद्राचे प्रमुख डॉ. प्रशांत शेटे यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहिती संपर्कसाठी अभियानाचे नोडल अधिकारी तथा कृषी विस्तार विषयतज्ज्ञ राहुल घाडगे ९४२२०८००११ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात

error: Content is protected !!