नारायणगाव : (प्रतिनिधी )ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव; प्रकल्प संचालक आत्मा, पुणे; आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार २३ एप्रिल, २०२५ रोजी सकाळी १०.०० ते साय. ५. ०० वा दरम्यान एकदिवसीय केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या एक दिवसीय कार्यशाळेत केळी क्लस्टर निर्मिती, निर्यातक्षम केळी उत्पादन तंत्रज्ञान (युरोपियन देश व आखाती देश), केळी पिकामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर, आणि केळी पिकासाठी शासनाच्या धोरणात्मक योजना यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.
या कार्यशाळेत केळी लागवडीपासून ते निर्यातीपर्यंत विविध क्षेत्रांतील तज्ञ आपले अनुभव शेतकऱ्यांशी आदान प्रदान करतील. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला पुणे माननीय जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे आणि प्रकल्प संचालक आत्मा सूरज मडके, केळी पिकातील ए आय (AI) विषयी रुजीत मेहेर हे देखील उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन अनिल तात्या मेहेर यांनी सर्व केळी उत्पादक शेतकऱ्यांना या महत्त्वपूर्ण कार्यशाळेचा उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ९४२२५१९१४३, ९४२१२७०५१० या क्रमांकावर संपर्क साधावा असे केंद्राचे प्रमुख डॉ. प्रशांत शेटे यांनी आवाहन केले.