खोडद येथे गावठी कट्टा बाळगणाऱ्याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या.

WhatsApp


नारायणगाव : (प्रतिनिधी ) बेकायदेशीर कट्टा बाळगला म्हणून खोडद येथील एकाला गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. अटक केलेल्या व्यक्तीचे नाव जितेंद्र रोहीदास पानमंद (रा.पानमंद मळा खोडद ता. जुन्नर जि. पुणे) आहे. राज्यातील आगामी पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकांच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये अग्नीशस्त्रे संबंधी कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक संदीप गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्या नुसार बुधवारी (दि. 12) रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जुन्नर विभागात पेट्रोलिंग करत असताना सहाय्यकपोलीस निरीक्षक महादेव शेलार यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की नारायणगाव पोस्टे हद्दीतील खोडद येथील जितेंद्र रोहीदास पानमंद रा.पानमंद मळा खोडद हा JMRT चौक खोडद येथे उभा असून त्याच्या ताब्यात बेकायदेशीर गावठी कट्टा आहे. मिळालेल्या बातमीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने पंचासमक्ष त्या ठिकाणी सापळा लाऊन जितेंद्र पानमंद याला ताब्यात घेऊन त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला खोसलेला एक गावठी कट्टा मिळून आला. हा गावठी कट्टा जप्त केला असून त्याबाबत नारायणगाव पोस्टे येथे गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या आरोपीची आरोपीची वैद्यकीय तपासणी करून नारायणगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कार्यवाही ही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिप गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर साहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, दीपक साबळे,संदीप वारे. ,राजु मोमीन,अक्षय नवले आदींनी केली आहे.

जाहिरात

error: Content is protected !!