शिवनेर भूषण स्व.केरुशेठ कोंडाजी वेठेकर,प्रवेशद्वार लोकार्पण सोहळा. विविध मान्यवर राहणार उपस्थित.

WhatsApp


नारायणगाव (प्रतिनिधी )

थोर वटवृक्षाच्या छत्रछायेखाली वाढलेला सर्व कष्टकरी,शेतकरी वर्ग.पैशापेक्षाही नेहमीच माणूसकी दाखवणारे शेठ बाबा… कधीही कामाची लाज बाळगली नाही.अगदी तरुण वयात रोजंदारीची कष्टाची कामं केली.अगदी जुन्या काळातील व्यक्ती विनोदाने एक शब्द बोलायच्या.पण कधी खंत बाळगली नाही.
नाव सांगताना सांगायचे…..
केरु कोंडाजी वेठेकर….
मोठेपणाचा हव्यास नाही.अत्यंत साधं प्रेमळ वागणं.पांढर्या शुभ्र धोतर आणि सदरा, पायात नेहमी मोजे आणि जुन्या पध्दतीचे बूट.खिशात सर्व हिशोबाच्या चिठ्ठ्या.मला तर अगदी हाताला धरून शेजारी बसवायचे‌.प्रत्येक विवाहसोहळ्यात त्यांच्या सोबत बसण्याचा आनंद अवर्णनीय.अगदी वडील बरोबर असल्याचा,त्यांचं कृपाछत्र बरोबर असल्याचा भास व्हायचा.
मला मागील घटना आठवते….बंगल्याचे कामाचे इंजिनिअर आले होते,बाबांबरोबर महत्वाची बांधकाम विषयक चर्चा करायची होती,पण त्यांना “तूमचं तुम्ही बघा, मुलांशी चर्चा करा,मला त्यातलं कळत नाही” असं सांगून कामात गर्क होणारे शेठबाबाच.
“बाहेर रीकामटेकडं फिरण्यापेक्षा शेतशिवारात घाम गाळा..‌‌.सोनं पिकवा.कोणालाही लुबाडू नका.प्रामाणिकतेची कास धरा” हि शिकवण त्यांचीच.वैयक्तिक याच शिकवणीवर मी सुध्दा तरलो आहे.एकत्र कुटुंबाची व्याख्या शिकावी त्यांच्याकडूनच.राम लक्ष्मण,भारताप्रमाणेच बंधुप्रेम. शेठबाबांचा शब्द अंतिम प्रमाण.सर्व वेठेकर कुटुंब एकाच छताखाली गुण्यागोविंदाने नांदणारे.मळगंगा यात्रेच्या पुरणपोळ्या अजूनही स्मरणात आहेत.यात्रेचं खरं मराठमोळं जेवण म्हणजे…. पुरणपोळी हे सांगणारे बाबाचं.गृहीणीने
परीपूर्ण ताजं जेवण घरी बनविण्यावर त्यांचा कटाक्ष असे.
खर्या कृषि क्रांतीचे जनक… शेतकर्याना योग्य बाजारपेठ मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं.कितीतरी पाणी पुरवठा योजनांचे ते शिल्पकार होते.प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन केळी कापनी,वजन याची खातरजमा ते स्वतः करायचे.अगदी कागदावर नजर मारली तर अचूक वजन सांगणारे बाबाच.कॅलक्यूलेटरही त्यांच्या हिशोबीपणावर कमी पडणार.आमचे कधीच पैसे मोजून घेतले नाही,आलेले पैसे लगेचच गरजवंताला पुढे फिरवणार.
मी जीवनात असंख्य माणसं पाहीली, परंतू असा निरपेक्ष वृत्तीचा साधा,सालस माणूस पाहिला नाही.मोठेपणा न मिरवता प्रत्येक लग्न… सामुदायिक विवाह सोहळ्यात.ग्रामवैभव मळगंगा मातेचं मंदिर बांधकामासाठी तनमनधनाने एकरुप झालेले बाबाचं.त्यांच्याच मुळे आज जुन्नर तालुक्यातील वैभवशाली मंदिर उभं आहे.उंच कळस जरी सोन्याचा दिमाखदार मिरवत असला तरी,पाया बाबांनीच भरला आहे.
आजही पिंपरी पेढांरला आलो तर,हाताला धरून मिसळ खाऊ घालणारे, सदाचारी वागणं शिकवणारे,बाबा सोबत आहेत असंच वाटतं.भावी पिढी सगळीचं संस्कारक्षम डॉक्टर, इंजिनिअर आहेत.प्रत्येकाला कष्टाची जाण आहे.
शिवनेरभुषण स्व.केरुशेठ कोंडाजी वेठेकर यांचं महानिर्वाण वैशाख शु.द्वितीया,सोम.दि.०६मे २०१९ रोजी झालं होतं.दुसर्या दिवशी अक्षयतृतीया…. खरोखरच अशी कृषिप्रधान देशातील कृषिनिष्ठ माणसं,दिपस्तंभा प्रमाणे मार्गदर्शन करतात,प्रेरणा देतात.अक्षय रहतात.बाबानां जाऊन सहा वर्ष लोटली.परंतू शेठबाबा सर्वांच्या ह्दयस्थानी विराजमान आहेत.त्यांच्या वटवृक्षाच्या छायेखाली आपण सर्व आहोत.त्यांनी कधीच प्रसिध्दीचा हव्यास धरला नाही.परंतू शेठ बाबांचे चिरंतन प्रेरणादायी स्मारक आपल्यापुढे रहावे म्हणून सुपुत्र श्री रोहीदास वेठेकर सर यांनी गावचे अतिशय वैभवशाली,दिमाखदार,भव्य प्रवेशव्दार उभारले आहे.वैभवशाली पिंपरी पेढांरच्या सौंदर्यात भर पडली आहे. निश्चितच शेठबाबांचा कृपाशीर्वाद सर्वांवर रहाणार आहे.आपण सर्वजण मंगळ.दि.२९ मे२०२५ ला उपस्थित राहून भावपूर्ण आदरांजली वाहूया..

जाहिरात

error: Content is protected !!