नारायणगाव : (प्रतिनिधी) जुन्नर तालुक्यामध्ये पुन्हा चोऱ्यांचे सत्र वाढू लागल्याने जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. मागील एक महिन्यापूर्वी जुन्नर तालुक्यात दिवसात झालेल्या चोऱ्यांचा शोध अद्यापपोलिसांना लागलेला नाही. जुन्नर तालुक्यामध्ये पुन्हा भुरट्या चोऱ्यांचे सत्र सुरू झाले असून जनतेच्या मनामध्ये भीती निर्माण होऊ लागली आहे. नारायणगाव येथील पुणे नाशिक महामार्गावर दोन दिवसापूर्वी पहाटेच्या सुमारास तीन चार दुकाने चोरट्यांनी फोडून रोख रक्कम व काही साहित्य चोरट्यानी लंपास केले असून चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही झाले आहेत.तसेच येडगाव, पिंपळवंडी, बोरी व पिंपरी पेंढार येथे दिवसाढवळ्या झालेल्या चोरीचा अद्याप शोध लागलेला नाही. वडगाव आनंद येथील प्रशांत चौगुले यांच्या घरी काही दिवसांपूर्वी झालेल्या चोरीचा मुद्देमाल व काही चोरटे सापडले आहेत. या चोरीतील पूर्ण टोळी शोधण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही.तसेच इतर ठिकाणच्या चोरीचा मात्र लागलेला नाही.
वारुळवाडी येथे काही दिवसापूर्वी दिवसा ढवळ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरी चोरी होऊन दागिने व रोग रक्कम चोरी गेली होती. त्याचाही तपास लागण्याचे अद्याप काही समजले नाही. दरम्यान जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांची बदली होऊन त्यांचे जागेवर धनंजय पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता पाटील यांची जबाबदारी वाढली असून या भुरट्या चोरांना रोखण्याचे आव्हान त्यांच्यापुढे उभे आहे.
दरम्यान दिवसा व रात्री बिबट्याच्या भीतीबरोबर चोरट्यांची भीती वाढल्याने जनतेच्या मनात भीती निर्माण होऊ लागली असून या जनतेला धीर देण्याची पोलिसांची जबाबदारीअधिक वाढली आहे. अर्थात केवळ पोलिसांची जबाबदारी वाढली असे नाही तर स्थानिक नागरिकांनी देखील ग्रामसुरक्षा पथकाला अधिक अलर्ट करणे गरजेचे आहे. आमदार शरद सोनवणे यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत नाराजी व्यक्त केली होती. तसेच तालुक्याला कणखर पोलीस अधिकारी ची गरज असल्याचे त्यावेळी त्यांनी सांगितले होते. आता उपविभागीय अधिकारी म्हणून बदलून आलेले धनंजय पाटील हे आमदार शरद सोनवणे यांच्या कसोटीला उतरतील तालुक्यातील कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहतील अशी अपेक्षा त्यांच्याकडून जनतेला आहे.