जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषदेचे 8 गट तर 16 गण.

WhatsApp

नारायणगाव : ( प्रतिनिधी)
जुन्नर तालुक्यात आठ जिल्हा परिषद 8 गट आणि 16 पंचायत समिती गण यामध्ये बऱ्याच गावांचा फेरबदल झाल्याने इच्छुक मंडळींचा हिरमोड झाल्याचे पाहायला मिळत आहे. प्रत्यक्षात आरक्षण जाहीर झाल्यावर इच्छुक मंडळींकडून गट व गणात मोर्चे बांधणी सुरू होईल. दरम्यान महायुती व महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढतात की एकला चलो रे असा निर्णय घेतात यावर बरंच काही अवलंबून आहे.
दरम्यान जुन्नर तालुक्यामध्ये सध्या सर्वच पक्ष स्वतंत्र लढण्याच्या तयारीत असून तशा पद्धतीने रणनीती आखण्यात सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी व महायुती अशी जर निवडणूक लढवली गेली आणि उमेदवारी वाटपात जास्त वाद झाला नाही व एकास एक उमेदवार उभे केले तर मात्र लढाई चुरशीची होऊ शकते.
दरम्यान कोणता गट व कोणता गण आरक्षणात कोणत्या प्रवर्गाला जातो? यावर सुद्धा बरीच गणितं अवलंबून आहेत. निवडणूक जाहीर कधी होते व आरक्षण जाहीर कधी होणार याकडे इच्छुक मंडळींचे डोळे लागले आहेत.
दरम्यान जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट आणि गणांची प्रारूप प्रभाग रचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जाहीर केली असून 21 तारखेपर्यंत हरकती मागवलेल्या आहेत. तथापि जुन्नर तालुक्यामधून मात्र अद्याप एकही हरकत नोंदवली गेलेली नाही.
जुन्नर तालुक्यात मागील वेळी 7 जिल्हा परिषदेचे गट होते तर 14 गण होते. यावेळी जिल्हा परिषदेचा एक गट व पंचायत समितीचे दोन गण वाढले आहेत. त्यामुळे काही गावांची अदलाबदल झाल्याने काही इच्छुक मंडळींना याचा फटका बसणार आहे.
डिंगोरे -उदापूर गट – या गटामध्ये उदापूर, पिंपळगाव जोगा, अहिनेवाडी, मंदारणे, आंबेगव्हाण चिल्हेवाडी, मांडवे, कोपरे, सांगणारे, खुबी,पारगाव तर्फे मढ, तळेरान डिंगोरे नेटवर्क बल्लाळवाडी आमले पांगरी तर्फे मढ, मढ, सीतीवाडी गोळेगाव, अलदरे या गावांचा समावेश आहे. या अंकुश आमले विजय झाले होते.
ओतूर- धालेवाडी तर्फे हवेली गट– या गटामध्ये ओतुर,रोहोकडी, डुंबरवाडी खामुंडी, धालेवाडी तर्फे हवेली, धोलवड, ठिकेकरवाडी, हिवरे खुर्द,हिवरे बुद्रुक, भोरवाडी, विघ्नहर नगर, ओझर, तेजेवाडी, शिरोली खुर्द, कुमशेत, शिरोली बुद्रुक या गावांचा समावेश आहे. या गटामध्ये मागच्यावेळी मोहित ढमाले विजय झाले होते. शिरोली बुद्रुक, शिरोली खुर्द, तेजेवाडी धालेवाडी ही गावे नव्याने या गटामध्ये समाविष्ट झाली आहेत.
आळे- पिंपळवंडी या गटामध्ये पिंपळवंडी, काळवाडी, उंब्रज क्रं. 1, उंब्रज क्रं. 2, पिंपरी पेंढार, आळे, वडगाव आनंद,संतवाडी, कोळवाडी या गावांचा समावेश आहे या गटामध्ये मागील वेळी शरद लेंडे अवघे एकमताने विजय झाले होते. शिवसेनेचे मंगेश काकडे यांचा या गटातून एक मताने पराभव झाला होता. तसेच आमदार शरद सोनवणे यांचे बंधू शशी सोनवणे यांचाही दारून पराभव झाला होता. या गटामध्ये नेताजी डोके अथवा त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य नयना डोके उभ्या राहू शकतात.
राजुरी- बेल्हे गट- या गटामध्ये राजुरी, उंच खडक, गुळुंचवाडी, नळावणे, आणे,पेमदारा, शिंदेवाडी, बेल्हे,गुंजाळवाडी,बांगरवाडी, तांबेवाडी, रानमळा,साकोरी तर्फे बेल्हे,मंगरूळ, व झाप या गावांचा समावेश असून मागील वेळी या गटामधून पांडुरंग पवार विजय झाले होते. सध्या या गटामधून अनेक जण इच्छुक आहेत जुन्नर तालुक्यामध्ये या गटातील निवडणूक चांगली चुरशीची होऊ शकते.
बोरी – खोडद गट – जुन्नर तालुक्यामध्ये हा गट नव्याने तयार करण्यात आला असून या गटात या अगोदरच्या आजूबाजूच्या गटातील काही गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गटामध्ये बोरी बुद्रुक, जाधववाडी,निमगाव सावा, औरंगपूर,पारगाव तर्फे आळे, शिरोली तर्फे आळे, सुलतानपूर, पिंपरी कावळ, खोडद,कांदळी, वडगाव कांदळी, बोरी खुर्द, येडगाव या गावांचा समावेश आहे. मागच्या निवडणुकीमध्ये येडगाव हे नारायणगाव -वारूळ वाडी गटामध्ये होते. या गटातून पांडुरंग पवार यांच्या नावाची चर्चा आहे. तसेच बाळासाहेब बढे यांनी निवडणूक लढवावी असाही कार्यकर्त्यांचा आग्रह आहे.
नारायणगाव वारूळवाडी गट – या गटामध्ये मागच्या वेळेला भाजपा आशाताई बुचके विजयी झाल्या होत्या त्यांनी राजश्री बोरकर यांचा पराभव केला होता . सध्या या गटामध्ये इच्छुकांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष खैरे नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे, सुजित खैरे, माऊली खंडागळे महेश शेळके, प्रियंका शेळके व आशाताई बुचके या नावांचा समावेश आहे. या गटामध्ये नारायणगाव, धनगरवाडी वारूळवाडी,गुंजाळवाडी, मांजरवाडी, हिवरे तर्फे नारायणगाव एवढ्याच गावांचा समावेश आहे.
सावरगाव – कुसुर गट – या गटामध्ये काही गावांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. या अगोदर या गटामधून गुलाब पारखे विजय झाले होते. या वेळेला या गटातून आशाताई बुचके, गुलाब पारखे, अरुण पारखे, संतोष चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे. या गटात सावरगाव, निमदरी, खिल्लारवाडी, आगर, धामणखेल, खानापूर, बस्ती, निमगाव तर्फे महाळुंगे, वडगाव सहानी, पिंपळगाव तर्फे नारायणगाव कुरण, आर्वी, कुसुर, निरगुडे, सोमतवाडी खानगाव, येणेरे, विठ्ठलवाडी, काले,दातखीळवाडी, बुचकेवाडी, पारुंडे,विठ्ठलवाडी, काटडे, वडज, व चिंचोली या गावांचा समावेश आहे.
बारव- तांबे गट -हा गट मागच्या वेळेला तांबे पाडळी या नावाने ओळखला जात होता. मागील वेळेला या गटामधून देवराम लांडे यांनी जिल्हा परिषदेचे नेतृत्व केले होते. यावेळी देवराम लांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करून पुन्हा शिवसेनेची घरोबा केला आहे त्यामुळे या गटात देवराम लांडे यांना ही निवडणूक फारशी सोपी जाणार नाही. लांडे यांना त्यांच्याच पक्षातून अधिकचा विरोध आहे. दत्ता गवारी या गटातून त्यांच्या विरोधात बंडखोरी करू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजिंक्य घोलप अथवा त्यांची पत्नी नीलम घोलप उभ्या राहू शकतात. तसेच या गटामधून देवराम लांडे यांच्या सून माई लांडे यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो. देवराम लांडे यांनी काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस मधून शिवसेनेत प्रवेश केला आहे तथापि ते शिवसेनेमध्ये फारसे समाधानी नसल्याने ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची शक्यता आहे. तांबे – बारव गटात पुढील गावांचा समावेश होत आहे.पाडळी, पिंपळगाव सिद्धनाथ, माणिकडोह, खामगाव, गोद्रे, हडसर,राजूर, उंडेखडक, निमगिरी, खटकाळे, केवाडी, जळवंडी देवळे, अजनावळे, तांबे, बेलसर, सुराळे, तेजुर, चावंड, आपटाळे, पूर, घाटघर, बॉतार्डे, हिवरे तर्फे मिन्हेर, राळेगण, शिंदे, वानेवाडी, धालेवाडी तर्फे मिन्हेर, सोनावळे, घंगाळदरे, सुकाळवेढे, इंगळून उच्चील, आंबोली, भिवाडे बुद्रुक, भिवाडे खुर्द,आंबे, आणि हातवीज. या गावांचा या गटामध्ये समावेश
दरम्यान जुन्नर तालुक्यामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना झाला तर निवडणुकीत रंगत येईल. तथापि प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढल्यावर विजयासाठी प्रत्येकाला खूपच मेहनत घ्यावी लागू शकते. आमदार शरद सोनवणे माजी आमदार अतुल बेनके भाजपाने नेत्या आशाताई बुचके व विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर हे तुल्यबळ नेते आहेत. राज्यात असलेली महायुती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत होईलच असे नाही त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाच्या स्थानिक नेत्यांची एकला चलो रे अशी भूमिका असल्याचे सध्यातरी पाहायला मिळत आहे.

जाहिरात

error: Content is protected !!