जुन्नर पंचायत समितीच्या उपसभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?

WhatsApp

*विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा*
जुन्नर पंचायत समितीचे सभापती कोण होणार तसेच उपसभापदीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ? याबाबतची उत्सुकता वाढली असून आमदार शरद सोनवणे यांच्या गळाला कोण सदस्य लागलाय याबाबत देखील वेगवेगळी चर्चा होत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे अमित ढोले व भाजपाचे संजय वऱ्हाडी या दोन्ही सदस्यांच्या संपर्कात आमदार शरद सोनवणे असल्याचे समजते. तथापि अमित ढोले यांना उपसभापतीपदाची संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संजय वऱ्हाडी यांनी देखील तालुकाप्रमुख बाबू पाटे यांच्या मध्यस्थीने आमदार शरद सोनवणे यांची भेट घेतली आहे. अगोदर पाठिंबा द्या मग प्रथम कोणाला उपसभापती करायचे ते आपण ठरवू अशी भूमिका आमदार सोनवणे यांची असल्याचे समजते. त्यामुळे संजय वऱ्हाडी सध्या तटस्थ राहण्याची शक्यता आहे. अमित ढोले यांनी शिवसेनेचा सभापती होण्यासाठी पाठिंबा देऊ नये अशा पक्षाचा आदेश असल्याचे समजते. तथापि त्यांनी परस्परस जर निर्णय घेतला तर पक्ष त्यांच्यावर कारवाई करू शकतो. सोमवारी सभापती पदाच्या खुर्चीवर कोण बसणार आणि उपसभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ? याबाबतची उत्सुकता मात्र संपूर्ण जुन्नरकरांना लागली आहे. आमदार शरद सोनवणे या निवडणुकीत काय चाल खेळतात? तसेच माजी आमदार अतुल बेनके काही डावपेच टाकतात का याबाबतही उत्सुकता आहे. जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीत आमदार सोनवणे सुसाट सुटले होते परंतु जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांना माजी आमदार अतुल बेनके यांनी रोखले आहे. जुन्नर नगर परिषदेची सत्ता शिवसेनेची आली परंतु नगराध्यक्षांच्याच विरोधात तक्रार करण्याची पाळी सेनेच्या नगरसेवकांवर आली आहे. आमदार शरद सोनवणे ही गटबाजी रोखण्यात अपयशी ठरले आहेत.

जाहिरात

error: Content is protected !!