“जयहिंद” ची ड्रोनची कार्यशाळा संपन्न.

WhatsApp

नारायणगाव (प्रतिनिधी) जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालय कुरण येथील इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन विभागात शिकत असणाऱ्या द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय ड्रोन बनवणे कार्यशाळा घेण्यात आली. तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन तीन टप्प्यात करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यामध्ये ड्रोन विषयीची मुलभूत माहिती व आवश्यक साधनसामुग्री याविषयी विद्यार्थ्यांना अवगत करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यामध्ये ड्रोन उडवणे व त्यासाठी लागणारे प्रोग्रामिंग याचे प्रशिक्षण देण्यात आले आणि तिसऱ्या टप्प्यांमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ६० विद्यार्थी सहभागी झाले होते.
अंतिम टप्प्यांमध्ये प्रश्नमंजुषा चे आयोजन करून त्यातून तीन विजेते घोषित केले होते. यावेळी जटायु कंपनीचे वरिष्ठ ड्रोन मार्गदर्शक निखिल पतंगे, प्रशांत धेंड यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना स्पर्धेमुळे उद्योग जगातील संवाद साधण्याची, नवीन तंत्रज्ञान आणि उद्योग जगातील आव्हाने समजून घेण्याची तसेच नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याची संधी मिळाली. या स्पर्धेमध्ये दिशा गाढवे, तेजश्री पोखरकर, सानिका दुर्गुडे यांना पारितोषिक मिळाली.
याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. जितेंद्र गुंजाळ, संचालिका डॉ. शुभांगी गुंजाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एस गल्हे, प्राचार्य डॉ. डी. जे. गरकल आणि शैक्षणिक समन्वयक डॉ. व्ही. एम. धेडे यांनी अभिनंदन केले.
या कार्यशाळेसाठी विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे विभाग प्रमुख डॉ. आर एम मुळजकर, कार्यशाळा समन्वयक प्राध्यापक ए. एस. भोर यांचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

error: Content is protected !!